सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (प्रभात डेअरी - लॅक्टलीस ग्रुप) (Sunfresh Agro Industries Private Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

श्रीरामपुर : रांजणखोल, ता. राहाता, जी. अहमदनगर येथील सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (प्रभात डेअरी - लॅक्टलीस ग्रुप) (Sunfresh Agro Industries Private Limited) या नामांकित दूध प्रक्रिया प्रकल्पातील कायमस्वरूपी कामगार, नोंदणीकृत सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रीज कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात पगार वाढीचा व अन्य सुविधांचा दुसरा वेतन करार अतिशय मैत्रीपूर्ण व आनंदी वातावरणात दि. ६ मार्च २०२४ रोजी उभयपक्षांमध्ये ४ वर्षांसाठी उत्साही वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्रातील इतर डेअरी कंपनीशी तुलना करता व दुसराच करार असल्याने अतिशय उत्तम करार मानला जात आहे.

कराराची ठळक वैशिष्ट्ये : 

करार कालावधी : हा ४ वर्षांचा करार दि. १ जानेवारी २०२३ ते दि. ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी लागू राहील. 

पगारवाढ : कंपनी व संघटनेचा हा दुसरा वेतन करार असुन यात CTC ११५००/- रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आलेली आहे. 
पहिले वर्ष - २०२३ या वर्षासाठी - ४०२४/- रुपये वाढ.
दुसरे वर्ष - २०२४ या वर्षासाठी - २३००/- रुपये वाढ.
तिसरे वर्ष - २०२५ या वर्षासाठी - २३००/- रुपये वाढ.
चौथे वर्ष - २०२६ या वर्षासाठी - २८७६/- रुपये वाढ.

फरक रक्कम : दि.१ जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२४ या काळातील वेतनातील फरक एकरकमी ३१ मार्च २०२४ अखेर सर्व कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

बोनस : बेसिक पगाराच्या हजेरीनुसार ८.३३% दरवर्षी दिवाळीला देण्यात येणार आहे.

वार्षिक सुट्ट्या : ८ कॅज्युअल लिव्ह, ९ पेड हॉलिडे, हजेरीनुसार १२ ते १५ पी. एल. लिव्ह देण्याचे मान्य करण्यात आले. 

मेडिक्लेम : रु.२ लाख ते रु.५ लाख लागु राहील, GPA क्लेम रु.५ लाख ते रु.५० लाख लागु राहील, GTL रु.३ लाख ते रु.३० लाख लागु राहील.

कामगाराच्या लग्नासाठी ५ हजार रुपये गिफ्ट व ५ दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

पुरुष कामगारास ५ दिवस पॅटर्निटी लिव्ह देण्याचे मान्य करण्यात आले. 

शोक रजा : प्रत्येक कामगारास प्रत्येक वर्षी २ दिवस शोक रजा देण्याचे मान्य करण्यात आले. 

युनिफॉर्म ३ जोड व सेफ्टी शुज १ जोड प्रति वर्षी देण्याचे मान्य करण्यात आले. 

महिला कामगारास मॅटर्निटी लिव्ह १८२ दिवस देण्याचे मान्य करण्यात आले.

हा वेतन करार एकूण २६७ कामगारांना लागु राहील त्यापैकी एकूण ६० कामगार हे या करारात नव्याने कायमस्वरूपी समाविष्ट करण्यात आले त्यासाठी व्यवस्थापनाने देखील मान्यता दर्शवली हि एक मोठी उपलब्धी आहे, त्यासाठी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले आहे. एकुणच या ६० नवीन कामगारांचा रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागलेला आहे.

संघटनेचा कोणताही सदस्य नोकरीत असताना कोणत्याही कारणास्तव त्याचा मृत्यु झाल्यास संघटनेचे सर्व सदस्य त्यांच्या परिवारास एक दिवसाचा पगार अदा करतील तसेच व्यवस्थापनाच्या वतीने इतर इन्शुरन्स वगळता त्वरित १० हजार रुपये अंत्यसंस्कार निधी म्हणुन त्या कामगारांच्या कुटुंबियांना देण्यात येईल.

    हा करार सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांच्या दालनात कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक एच.आर. डायरेक्टर - नरेश पुरीतीपती, प्लांट मॅनेजर - रितेश नाग, एच.आर. बिसनेस पार्टनर- रवी परलापल्ली, इंडस्ट्रियल डिरेक्टर - कृष्णा वरगत, एच.आर. मॅनेजर - संजय टेनी, सल्लागार - संजय राणे, प्रोडक्शन ए.जी.एम. - सुभाष वाघ व संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार म्हणुन राष्ट्रवादी कामगार सेल प्रदेश अध्यक्ष्यशिवाजीराव खटकाळे (भाऊ), संघटनेचे अध्यक्ष्य - अमोल आरंगळे, जनरल सेक्रेटरी- अजित गिरमे, कोशध्यक्ष्य- योगेश भोंडवे, सदस्य - अनिल गिरमे, सोमनाथ डांगे, अमित शिंदे व रवींद्र बनकर यांच्यात सकारत्मक वातावरणात हा करार करण्यात आला.

     राहाता, श्रीरामपुर, राहुरी हे तीन तालुके व श्रीरामपुर एम.आय.डी.सी. या सर्वांचा विचार करता संपुर्ण पंचक्रोशीतील सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (प्रभात डेअरी - लॅक्टलीस ग्रुप) (Sunfresh Agro Industries Private Limited) हा सर्वात मोठा उद्योग असुन सर्वात जास्त कामगार असलेली कंपनी म्हणुन या भागात या उद्योगाचा नावलौकीक आहे. याचबरोबर श्रीरामपुरची बहुतांश बाजारपेठ याच उद्योगावर अवलंबुन असल्या कारणाने कामगार संघटना या उद्योगाच्या भरभराटीसाठी कायम प्रयत्नशील आहे.