कापूस पिंजणे व दाबणे उद्योग मूळ किमान वेतन दर अधिसूचना

कारखाने अधिनियम, १९४८ अंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व आस्थापनांत / उद्योगांत / कारखान्यांत/ रोजगारांत, कामावर असलेल्या कामगारांना तसेच मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८ अंतर्गत आस्थापनातील कामगारांना किमान वेतन अधिनियम १९४८ लागू आहे. 

     "किमान वेतन" या  संज्ञेत मूळ वेतन, अधिक कामगार विभागाने सदर रोजगाराकरिता वेळोवेळी विहित व प्रकाशित केलेले विशेष भत्ते यांचा समावेश होतो.

'कामगार नामा माध्यमातून विविध उद्योगातील मूळ किमान वेतन दर अधिसूचना कामगार वर्ग यांच्या पर्यंत पोहचावा हा एक प्रयत्न

कापूस पिंजणे व दाबणे उद्योग मूळ किमान वेतन दर अधिसूचना

राज्यातील कापूस पिंजणे व दाबणे उद्योगामधील मूळ किमान वेतन दर अधिसूचना दि. ०७ मे २०११ रोजी व विशेष भत्ता रक्कम दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर झाली असून या मोटार दुरुस्ती कार्यशाळा उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना मूळ किमान वेतन दर + महागाई भत्ता = एकूण किमान वेतन मिळणे कायद्यानुसार आवश्यक आहे.

महाराष्ट्रात ज्या आस्थापनेत ५० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना याउपर (किमान वेतनाच्या म्हणजेच मूळ वेतन +विशेष भत्ता) ५% किमान घर भाडे भत्ता देखील मिळतो.

टीप - विशेष भत्ता रक्कम दर सहा महिन्याला बदलली जाते त्यानुसार मूळ किमान वेतन दर + विशेष भत्ता रकम = किमान वेतन रक्कम गणली जाते.

राज्यातील कापूस पिंजणे व दाबणे उद्योगामधील मूळ किमान वेतन दर अधिसूचना दि.०७ मे २०११ पाहण्यासाठी 👉  क्लिक करा

विशेष महागाई भत्ता सह एकूण किमान वेतन परिपत्रक दि.१ जानेवारी २०२४ ते दि.३० जून २०२४ पाहण्यासाठी 👉 क्लिक करा