कारखाने अधिनियम 1948 अंतर्गत कारखाने (सुरक्षा लेखा परीक्षण) नियम 2014, मध्ये आणखी काही सुधारणा करण्याचे योजले असून त्यास अनुसरून नियमांचा मसुदा दिनांक 04 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. तरी उकत मसुदा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या समाप्तीनंतर विचारात घेण्यात येईल.
तरी उकत मसुद्याचा संदर्भात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना, संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,कामगार भवन,पाचवा मजला, ब्लॉक ई, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व) मुंबई ४०००५१ यांच्याकडे प्राप्त होतील त्या शासन विचारात घेईल.
उकत मसुदा संदर्भात हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी शेवटची तारीख १८ एप्रिल २०२४ आहे, ह्याची नोंद घ्यावी.
कारखाने (सुरक्षा लेखा परीक्षण) नियम 2014 सुधारणा मसुदा पाहण्यासाठी - क्लिक करा