चाकण : चाकण औद्योगिक वसाहत मधील भांबोली येथील Delloreto India Pvt. Ltd. कंपनी व्यवस्थापन आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या वेतनवाढ करार संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार पै. महेशदादा लांडगे, प्रमुख सल्लागार पै. रोहिदास गाडे पाटील, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, कंपनीचे डायरेक्टर कमल वाधवा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवार दिनांक ०३/०२/२०२४ रोजी करण्यात आला आहे.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
पहिल्या वर्षी ६०%, दुसऱ्या वर्षी २०%, तिसऱ्या वर्षी २०% मिळणार.
प्रत्येक कामगाराला प्रत्येकी ७ महिन्याचा पगारामध्ये देण्यात येणार आहे.
मेडिक्लेम पॉलीसी : कुटुंबासाठी रु.४,००,०००/- रुपयांची पॉलिसी राहणार असून संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले आणि आई-वडील यांचा समावेश करण्यात येणार आहे.
अ) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार व जादाचा मोबदला म्हणून रु.२५,००,०००/- (पंचवीस लाख) रुपये पॉलिसी कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.
ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी : चोवीस तास कव्हर असणारी रु.१०,००,०००/- (दहा लाख) रुपयांची पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
A) PL - २१, B) SL - ०९. C) CL - ०९, D) PH - १०
मतदानाची सुट्टी : सरकारी आदेशानुसार राहील.
दुखवटा सुट्टी : कामगाराच्या कुटुंबातील आई-वडील, पत्नी, मुले सख्खा भाऊ व बहीण यापैकी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास व्यवस्थापन त्या कामगारास त्याच्या गावापर्यंत जाण्यासाठी विनाशुल्क वाहतूक व्यवस्था करून देण्याचे मान्य झाले आहे.
पितृत्व रजा : सभासद कामगारास मुलगा अथवा मुलगी झाल्यास त्या कामगारास पितृत्व रजा म्हणून पाच दिवस सुट्टी देण्याचे मान्य झाली आहे.
दिवाळी बोनस : सर्व कामगारांना दिवाळी बोनस हा १५०००/- देण्यात येईल.
दिवाळी दसरा भेटवस्तू : दसऱ्याच्या दिवशी एक किलो मिठाई, दिवाळीला एक किलो ड्राय फ्रूट तसेच एक भेटवस्तू देण्याची मान्य झाले आहे.
सेवा कायम करणे : कंत्राटी कामगारांमधून ३४ कामगार कायम करण्याचा निर्णय मान्य झाला आहे
मासिक हजेरी बक्षीस : ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून रु.१५००/- ( एक हजार पाचशे) रुपये देण्यात येईल.
A) ५ वर्षे नोकरी झाल्यास रु.५,०००/-,
B ) १० वर्षे नोकरी झाल्यास रु.१०,०००/-,
C) १५ वर्षे नोकरी झाल्यास रु.१५,०००/-
१ ते ७ वी : ७०% ते ८०% - रु.५००/-, ८०% ते ९०% - रु.१०००/- आणि ९१% च्या पुढे रु.२०००/-
८ वी ते १२ वी : ७०% ते ८०% - रु.१०००/- रुपये, ८१% ते ९०% - रु.२०००/- आणि ९१% च्या पुढे रु.३०००/-
वैयक्तिक कर्ज सुविधा : प्रत्येक कामगारास CTC पगाराच्या १.५ पट देण्याचे मान्य, तसेच यापेक्ष्या जास्त रक्कम हवी असल्यास एकत्रित चर्चा करून मदत करण्यात येईल.
a) पूर्ण ड्रेस - २,
b) शूज - उच्च प्रतीचा देण्याचे मान्य,
c) हिवाळी व पावसाळी जर्किंग - तीन वर्षाला एक मिळणार
गुणवंत कामगार पुरस्कार : प्रत्येक वर्षी दोन गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना प्रत्येकी रु.५०००/- ( पाच हजार) एवढी रक्कम बक्षिस म्हणून देण्याचे मान्य,
पाळी भत्ता : तिसरे पाळीसाठी १००/- रुपये पाळी भत्ता देण्याचे मान्य.
A) नाश्त्याची सुविधा चालू करण्यात आली आहे. नाश्त्यासाठी आठवड्यातून दोन दिवस अंडी आणि एक ग्लास दूध देण्याची मान्य झाली आहे.
B) जेवणामध्ये आठवड्यातून एक दिवस अंडी व एक दिवस चिकन असे दोन दिवस नॉनव्हेज देण्याची मान्य झाली आहे.
C) सर्व कामगारांना बस सुविधा किंवा कंपनी पॉलिसी प्रमाणे कार सुविधेचा फायदा मिळणार.
कॅन्टीन व बस या दोन्ही सुविधा 100% फ्री देण्याचे मान्य
नैसर्गिक आपत्ती : कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा कोविड सारखी परिस्थिती उद्भवल्यास व्यवस्थापन पूर्ण वेतन देण्यास आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत देण्यास सहमत आहे.
करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. महेशदादा लांडगे, प्रमुख सल्लागार पै. रोहिदास गाडे पाटील, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, चिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, माथाडी कामगार नेते किसनराव बावकर, दत्तात्रय गवारी, प्रशांतआप्पा पाडेकर, रविंद्र भालेराव, महादेव येळवंडे, गृपो कंपनीचे युनिट अध्यक्ष संजय पाटील, सोमनाथ जानराव, युनिट अध्यक्ष कमलेश भोकसे, उपाध्यक्ष धनेश निघोजकर, सरचिटणीस पांडुरंग मराठे, खजिनदार बाबासाहेब दरेकर, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे डायरेक्ट कमल वाधवा, सी.ओ.ओ. मनोज गर्ग, श्रीमती धरणी सतिशकुमार, एच आर हेड रणपाल सिंह , एच.आर. मॅनेजर ओंकार चव्हाण यांनी सह्या केल्या.
संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. माहेशदादा लांडगे, अध्यक्ष जीवन येळवंडे व कंपनी डायरेक्ट कमल वाधवा यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले, प्रास्ताविक एच.आर. मॅनेजर ओंकार चव्हाण तसेच सूत्रसंचालन सौ. पुजाताई थिगळे यांनी केले व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारानी डीजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.