राज्यातील बेकरी उद्योगामधील मूळ किमान वेतन दर अधिसूचना दि.९ जानेवारी २०१७ रोजी व विशेष भत्ता रक्कम दि. १ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झाली असून या बेकरी उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना मूळ किमान वेतन दर + महागाई भत्ता = एकूण किमान वेतन मिळणे कायद्यानुसार आवश्यक आहे.
महाराष्ट्रात ज्या आस्थापनेत ५० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना याउपर (किमान वेतनाच्या म्हणजेच मूळ वेतन +विशेष भत्ता) ५% किमान घर भाडे भत्ता देखील मिळतो.
टीप - विशेष भत्ता रक्कम दर सहा महिन्याला बदलली जाते त्यानुसार मूळ किमान वेतन दर + विशेष भत्ता रकम = किमान वेतन रक्कम गणली जाते.
राज्यातील बेकरी उद्योगामधील मूळ किमान वेतन दर अधिसूचना दि.९ जानेवारी २०१७ पाहण्यासाठी - क्लिक करा