क्नोर ब्रेमसे सिस्टिम्स फोर कमर्शियल व्हेईकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Knorr Bremse Systems For Commercial Vehicles India Pvt Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : हिंजवडी औद्योगिक नगरीतील  क्नोर ब्रेमसे सिस्टिम्स फोर कमर्शियल व्हेईकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Knorr Bremse Systems For Commercial Vehicles India Pvt Ltd.) हिंजवडी कंपनी व्यवस्थापन आणि क्नोर ब्रेमसे एम्प्लॉईज युनियन हिंजवडी यांच्यामध्ये पाचवा वेतनवाढीचा करार, शांततामय उत्साहवर्धक आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

कराराचा कालावधी : दि. 01/04/2023 ते दि. 31/03/2026 (तीन वर्ष)

कराराची रक्कम : रु.16,500 /- असेल विभागणी तीन टप्प्यात  पुढील प्रमाणे     
पहिले वर्ष - (60%) - रु. 9900/- 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 
दुसरे वर्ष - (20%) रु. 3300/- 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 
तिसरे वर्ष - (20%) रु. 3300/-   1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 

एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 या नऊ महिन्याचा फरक एकरकमी 31 जानेवारी 2024 पर्यंत देण्यात येईल

रजा : अर्जित रजा 4 ने वाढून 38 वरून 42 झाल्या  आहेत. 

वाढदिवसाची रजा : प्रत्येक कामगाराला वर्षातून 1 वाढदिवसाची किंवा लग्न वाढदिवसाची रजा मिळालेली आहे 

शॉर्ट लिव्ह : कामगारांना प्रत्येक महिन्यातुन एकदा दोन तासाची शॉर्ट लिव्ह मिळेल 

कर्ज : दि. 1 जानेवारी 2024 पासून प्रत्येक महिन्यात 2 कामगारांना ₹ 1,00,000/- चे कर्ज चालू करण्यात आले आहे. त्याची परतफेड 7% टक्के व्याजदराने चार वर्षात करायची आहे

रात्रपाळी भत्ता : यामध्ये रु. 20/- ने वाढ करून रु.40/- वरून रु. 60/- प्रति दिन एवढी करण्यात आली आहे. 

मेडीक्लेम पॉलिसी : कामगारांना प्रत्येकी रु.5,00,000/- ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी  कायम ठेवण्यात आलेली आहे  ज्यामध्ये स्वतः, पत्नी, दोन मुले,आई-वडील किंवा सासू-सासरे यांचा समावेश  आहे. तसेच बफर पॉलिसी ही रु.15,00,000/- कायम ठेवण्यात आलेली आहे

वाहतूक सुविधा : जे कामगार अंबडवेट,जांबे, कासारसाई या भागात राहत आहेत व याभागात बस सुविधा उपलब्ध नाही, असे कामगार कंपनीच्या ट्रॅव्हल पॉलिसीनुसार किलोमीटर प्रमाणे ट्रॅव्हल क्लेम  करू शकतात 

मृत्यू सहाय्यता निधी : प्रत्येक कामगाराचा एक दिवसाचा पगार व तेवढीच रक्कम कंपनीकडून तसेच स्टाफचे ऐच्छिक योगदान असे ठरवण्यात आलेले आहे, ग्रुप टर्म लाइफ इन्शुरन्स प्रमाणे प्रत्येक कामगाराला रु.30,00,000/- चे विमा संरक्षण देण्यात आलेले आहे. 

याशिवाय पूर्वीच्या करारात जे मुद्दे आहेत ते तसेच चालू राहतील 

    सदर करार यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने परमजीत सिंग चड्डा (मॅनेजिंग डायरेक्टर), रोहिणी देशमुख (एच आर विभाग हेड), समीर आचार्य (असिस्टंट एच.आर. मॅनेजर) तसेच युनियनच्या वतीने सचिन कळमकर (अध्यक्ष), अमोल देशमुख (उपाध्यक्ष), संजय क्षीरसागर (जनरल सेक्रेटरी), संतोष करोटी (सह सेक्रेटरी), संतोष खोराटे (खजिनदार), रवींद्र काकडे (सदस्य), महेश कदम (सदस्य) यांनी करारावर स्वाक्षरी केली.

   सदर करार यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले जनरल सेक्रेटरी अविनाश वाडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे पदाधिकारी, सल्लागार,कामगार चळवळीसाठी आणि कामगारांच्या हितासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचे सहकार्य लाभले.

    व्यवस्थापनाची सामंजस्याची भूमिका आणि सकारात्मक दृष्टिकोन आणि संघटनेच्या सर्व सभासदांनी राखलेला संयम, अभेद्य एकजूट, केलेले सहकार्य, संघटना आणि संघटनेतील प्रतिनिधीच्यावर ठेवलेला विश्वास यांच्या बळावर हा करार यशस्वीरित्या संपन्न झाला.