हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस लिमिटेड (Hindusthan Bevrages Coca Cola India Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

मुंबई : वाडा येथील हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस लिमिटेड (Hindusthan Bevrages Coca Cola India Limited)  कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2027 या चार वर्षांकरिता 16,902 रुपयांची पगारवाढ मिळणार आहे. 

    त्याचबरोबर कामगारांना कामगारांना व्हेरिएबल डियरनेस अलाऊन्स 2300 रुपये, परफॉर्मन्स लिंक व्हेरिएबल पे 5000 रुपये, प्रॉडक्टिव्हिटी लिंक बोनस स्कीम (वार्षिक) 12,000 रुपये, लाँग सर्विस अवार्ड (वार्षिक) 20,000 रुपये, दिवाळी गिफ्ट कुपन 3500 रुपये, नवीन गिफ्ट व्हाऊचर पॉलिसीप्रमाणे 2700 रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर असे विविध लाभही मिळणार आहेत.

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नेते-खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या सूचनेनुसार व संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली ही पगारवाढ करण्यात आली.

    सदर करारावर व्यवस्थापनातर्फे क्लस्टर एचआर हेड रामचंद्र होनप, फॅक्टरी मॅनेजर योगेश भावसार, फॅक्टरी एचआर मॅनेजर रूपेश परदेशी, एचआर टीम लीडर श्रद्धा शेट्टी, गणेश सिनारे तसेच वाडा युनिट कमिटीचे युनिट अध्यक्ष विवेक पाटील, युनिट सचिव स्वप्नील चौधरी, युनिट उपाध्यक्ष संतोष पाटील, युनिट खजिनदार अविनाश पाटील, युनिट कमिटी सदस्य राहुल वेखंडे, कल्पेश घरत, रूपेश रिकामे यांनी सह्या केल्या. भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस सूर्यकांत पाटील, सहचिटणीस दिनेश पाटील तसेच कार्यकारिणी सदस्य किरण भोईर, ज्ञानेश्वर ठाकरे, योगेश ठाकरे यावेळी उपस्थित होते.