पुणे : कामगार नेते अविनाश वाडेकर यांना ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशनचा राज्यस्तरीय सेवाभूषण पुरस्कार–कामगार आणि कामगारांच्या कल्याणासाठी काम करणारा सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार भारत शासनाचे पद्मश्री पुरस्कार मिळणारे फोटो जर्नलिस्ट,एडिटर श्री. सुधारकजी ओलवे यांच्या हस्ते (दि.०७ जानेवारी) देण्यात आला.
अविनाश वाडेकर हे लॉरियाल इंडिया कामगार संघटनेचे अध्यक्ष असून राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ सचिव पदी कार्यरत आहेत.कामगार क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याचा मोठा अनुभव असून विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.त्यात प्रामुख्याने चाकण आळंदी पत्रकार संघाचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा कामगार हितसंवर्धन कामगार संघटना पुरस्कार लाॕरियाल संघटनेला,तसेच राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचा के.रावबहादुर नारायण मेघांनी लोखंडे कामगार भूषण पुरस्कार मिळाले.
यावेळी अविनाश वाडेकर म्हणाले कि, माझ्या आई-वडिलांच्या संस्कारामुळे, अर्धागीनीने दिलेल्या साथीमुळे, भाऊ-बहिणीच्या आशिर्वादामुळे, नातेवाईकांच्या प्रेमामुळे, लहान पणापासून मला ज्या मित्रांचा सहवास लाभला त्या सर्व मित्रांमुळे, माझ्या रासे गावातील सर्व गावकऱ्यांमुळे, विशाल गार्डन सोसायटीतील सर्व रहिवाशांमुळे, मला लाभलेल्या सर्व गुरुजणांच्या आशिर्वादामुळे, माझी लाॅरियाल कंपनी व कंपनीतील सर्व कामगार बंधू भगिनीवर्ग व व्यवस्थापन वर्ग यांच्यामुळे तसेच महासंघातील सर्व संलग्न संघटना व त्यातील कामगार वर्ग यांच्यामुळे मिळाला आहे.
आज ख-या अर्थाने आठवण येते ती आई-दादांची व मित्र शुक्राचार्य याची ते असते तर त्यांनाही खुप आनंद झाला असता.आई-दादांचा आशिर्वाद व मित्राची साथ सदैव माझ्या पाठीशी आहे हे मी जाणतो. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला तुम्ही भरभरुन शुभेच्छा दिल्या, भरभरुन शुभेच्छा मिळणे म्हणजे सत्कार्य केल्याची पोचपावती, आता जबाबदारी वाढली आहे, पुढे जाऊन यश कितपत येईल माहित नाही परंतु सत्य व प्रामाणिकपणाची कास कधी सोडणार नाही.तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे मी खुप भारावून गेलो आहे असे हि वाडेकर म्हणाले.