पुणे : पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या मागील अनेक महिन्यांपासून असलेल्या तक्रारी व प्रलंबित मागण्या विषयी महासंघ दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ पुणे सकाळी ११:०० वा. आंदोलन करणार आहे.
वारंवार पत्र व्यवहार करून ही सुरक्षा रक्षकांना न्याय मिळत नाही.मंडळ एकाधिकारशाही वापरत असुन त्याचा त्रास सुरक्षा रक्षकांना होत आहे. सुरक्षा रक्षकांचे खाते खाजगी कोटक बँकेत उघडुन वेळेत पगार होत नाही, सुरक्षा रक्षकांच्या वेतनातून कपात केलेली TDS ची रक्कम अद्याप मिळाली नाही, PF स्लीप,गणवेशाची शिलाई ची रक्कम अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन करणार असुन मागण्या मंजुर न झाल्यास आमरण उपोषण सुध्दा करणार आहोत. अशी माहिती जिल्हा अध्यक्ष युवराज नाळे,सचिव तुकाराम कुंभार, पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजकुमार काळे,सचिव सयाजी कदम आणि प्रदेश संघटन मंत्री अविनाश मुंढे यांनी दिली.
सुरक्षा रक्षकांच्या तक्रारी व प्रलंबित मागण्या :
१) सुरक्षा रक्षकांचे वेतन बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेतच करावे
२ ) सुरक्षा रक्षकांना पीएफ स्लीप देण्यात यावी.
३) डिसेंबर २०२० मध्ये मिळालेल्या ४ गणवेशाची शिलाई रक्कम रु.५०० प्रमाणे तत्काळ बँक खात्यात जमा करावी.
४) सेवा अभिलेखाची (सेवा पुस्तिका) अमलबजावणी झाली पाहिजे.
५) सुरक्षा रक्षकांच्या वेतानातुन कपात केलेली TDS ची रक्कम व्याजासह देण्यात यावी.
६) वेतनी रजा ( अर्जित रजा),किरकोळ रजा (नैमित्तिक रजा) यांची घरभाडे भत्तासह अमलबजावणी करा. किरकोळ रजेसाठी घरभाडे भत्ता सह लेवीमधे ३ टक्के इतकी वाढ करून लागु करावे.
७) भरपगारी रजा ( राष्ट्रीय सुट्टया) यांचे वेतन दुप्पट दराने देण्यात यावे.
८) ससुन हॉस्पिटल,पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र येरवडा, महापारेषण या अस्थापणानी निश्चित केलेल्या वेतना इतके वेतन देण्याचे आदेश द्यावेत.
९) मंडळातील नोंदीत आस्थापना वर नोंदीत सुरक्षा रक्षकांची नेमणुक तत्काळ करावी.
१०) भविष्य निर्वाह निधी शी सलग्न असलेली कर्मचारी ठेव सलग्न विमा योजना(EDLI )व पेन्शन योजना लागू करा. तसेच उपदान वरील विमा लागु करा.
११) भविष्य निर्वाह निधी व उपदान यावर कायदेशीर नियमांची अंमलबजावणी करावी.
१२) सुरक्षा रक्षकांना दिपावली बोनस १० टक्के दराने देऊन भेटवस्तु देण्यात यावी.