गृपोअँटोलिन प्रायव्हेट लिमिटेड (Grupo Antolin Pvt Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : येथील औद्योगिक वसाहाती मधील गृपोअँटोलिन प्रायव्हेट लिमिटेड (Grupo Antolin Pvt Limited) कंपनी व्यवस्थापन आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या वेतनवाढ करार दि.०२/१२/२०२३ रोजी संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार पै. महेशदादा लांडगे, प्रमुख सल्लागार पै.रोहिदास गाडे पाटील, संघटनेचे  अध्यक्ष जीवन येळवंडे, कंपनीचे डायरेक्टर श्री. बिश्व रंजन मोहंती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

एकूण पगारवाढ : रु.१८,००० /- (अठरा हजार रुपये)

कराराचा कालावधी : दि.०१/०४/२०२२  ते ३१/०३/२०२५ या तीन वर्षांचा राहील.

मेडिक्लेम पॉलीसी : कुटुंबासाठी रु.२,२५,०००/- पॉलिसी राहणार असून संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले आणि आई-वडील यांचा समावेश करण्यात येणार आहे. बफर १० लाख असेल

मृत्यू साहाय्य योजना : अ) रु.२५,००,०००/- (पंचवीस लाख) रुपये पॉलिसी कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.

ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी : २४ तास कव्हर असणारी रु.५,००,०००/- (पाच लाख) रुपयांची पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

सूटया : 
PL - २४० दिवसांना १९ रजा तसेच त्यापुढील प्रत्येक ७ दिवसांना १ PL या प्रमाणे एकूण २८ PL मिळतील, SL - ०७, CL - ०७, PH - ०९, मतदानाची सुट्टी:-  सरकारी आदेशानुसार राहील,

दुखवटा सुट्टी : कामगाराच्या कुटुंबातील आई-वडील, पत्नी, मुले सख्खा भाऊ व बहीण यापैकी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास व्यवस्थापन त्या कामगारास ५ दिवसाची सुट्टी देण्याचे मान्य केले.

दिवाळी बोनस : सर्व कामगारांना दिवाळी बोनस रु.३०,०००/- देण्यात येईल. 

दिवाळी : दिवाळीला एक किलो ड्राय फ्रूट तसेच एक भेटवस्तू देण्याची मान्य झाले आहे.

सेवा कायम करणे : कंत्राटी कामगारांमधून ०१ कामगार कायम करण्याचा निर्णय मान्य झाला आहे.

मासिक हजेरी बक्षीस : ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून रु.१०००/- (एक हजार) रुपये देण्यात येईल. व ज्याचे २४ दिवस भरतील त्यांना  ६००/ रुपये मान्य केले.

वैयक्तिक कर्ज सुविधा/ उचल : प्रत्येक कामगारास रु.३०,०००/- देण्याचे मान्य, ती रक्कम १० महिन्यात समान हप्त्याने कपात करण्याचे मान्य केले

ड्रेस : a) पूर्ण ड्रेस - २, b) शूज - उच्च प्रतीचा देण्याचे मान्य c) हिवाळी व पावसाळी जर्किंग: - दोन वर्षाला एक मिळणार.

रात्रपाळी भत्ता : तिसरे पाळीसाठी ५०/- रुपये पाळी भत्ता देण्याचे मान्य.

कॅन्टीन : कॅन्टीनचा मेनू  दोन्ही पक्ष मिळून ठरवणार व जेवणाची उत्तम गुणवत्ता असेल.

बस सुविधा : आहे ते मार्ग चालू राहतील.

पेट्रोल भत्ता : ज्या कामगारांना बस सुविधा नाही त्याना पेट्रोल भत्ता रु.२७००/- मान्य केला.

पगाराचा फरक : प्रत्येक कामगाराला प्रत्येकी २० महिन्याचा फरक करारावर सह्या झाल्यावर ८ दिवसात देण्यात येणार आहे.

वार्षिक सहल : सध्याची सुविधा कायम राहील.

       करारावरती  संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार पै. महेशदादा लांडगे, प्रमुख सल्लागार पै. रोहिदास गाडे पाटील, अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, युनिट अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष रवींद्र तेजम, सरचिटणीस महेंद्र कदम, खजिनदार भगवान शिंगोटे, सहचिटणीस शंकर मांडेकर, सदस्य पंकज क्षीरसागर, ज्ञानेश्वर पाटील,  

    व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे डायरेक्ट BU HEAD श्री. बिश्व रंजन मोहंती, प्लांट हेड वेंकट पुगाल, एच.आर इंडिया हेड सॅम्युअल, एच.आर. मॅनेजर दिपक खोत, एच.आर.असिस्टंस नितीन थोरबोले,  प्रोडक्शन हेड हिमांशू सिसोदिया, क्यालिटी हेड सूर्यनारायण यांनी सह्या केल्या.

      तसेच यावेळी उपस्थितांमध्ये माथाडी कामगार नेते किसनराव बावकर, उद्योजक महादेव येळवंडे, महिंद्रा लॉजिस्टिक माजी युनिट अध्यक्ष प्रशांतआप्पा पाडेकर, दत्तात्रय गवारे, रविंद्र भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

      संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, अध्यक्ष जीवन येळवंडे व एच.आर इंडिया हेड सॅम्युअल यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले, प्रास्ताविक एच.आर. दिपक खोत यांनी केले, तसेच सूत्रसंचालन पुजाताई थिगळे यांनी केले व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारानी डीजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.