शिरूर,पुणे : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या द्वारे कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना राबविल्या जातात आता यामध्ये 'शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) अर्थसहाय्य्य योजना' देखील लागू झाली, त्याबाबत कामगार कल्याण मंडळ यांचे परिपत्रक प्रसिद्ध केले असून याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो कामगार व कुटुंबियांना होणार आहे.
कामगार नामा कृती समिती द्वारे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणारे विविध योजनामध्ये 'शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) अर्थसहाय्य्य योजना' राबवावी अशी मागणी दि.१०/०६/२०२२ पासून सातत्याने करण्यात येत होती तसेच त्याबाबत पाठपुरवठा देखील करण्यात येत होता.
सध्याच्या काळामध्ये 'टायपिंग कोर्स' ला खूप महत्व प्रत्येकाला कॉम्पुटर टायपिंग येणे हि काळाची गरज असून शासनाच्या Clerical पदांसाठी देखील टायपिंग अनिवार्य आहे तरी कामगार व कुटुंबीय यांना टायपिंग शिक्षण असणे महत्वाचे होते.
कामगार कल्याण मंडळ योजनांमध्ये संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) अर्थसहाय्य्य योजना' समाविष्ठ केल्यानिमित्त कामगार नामा कृती समितीचे मुख्य समन्वयक भूषण कडेकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार सचिव, कामगार आयुक्त तसेच कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचे अभिनंदन व आभार मानले.
कामगार नामा कृती समितीचे लाखो कामगार यांच्या साठी पूर्वी प्राप्त झालेले अभूतपूर्व यश -