पिंपरी तळवडे येथील कंपनीत आग, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू, आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत

पिंपरी चिंचवड: तळवडे येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कंपनीत आग लागली आहे. या भीषण आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. कारखान्यात आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत सहा महिलांचे मृतदेह सापडले आहेत. आणखी कामगारांचा शोध सुरू आहे. जखमींमध्ये सात महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. 

    कारखाना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या देहूरोड पोलिस ठाण्यांतर्गत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींमध्ये सात महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून सहा जणांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या मेणबत्त्या आणि फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील फटाक्यांच्या गोदामाला ही आग लागली होती.

    या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे वाढदिवसाच्या केक वर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे.

आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत, मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनेबाबत शोक व्यक्त

पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.