सिप्ला कंपनी (Cipla Company) येथे वेतनवाढ करार संपन्न

उरण : सिप्ला कंपनीच्या (Cipla Company) पाताळगंगा, तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील कारखाना काम करणाऱ्या कामगारांच्या वेतन वाढीचा करार भारतीय मजदूर संघ प्रणित महाराष्ट्र राज्य औद्योगिक कामगार महासंघ आणि सिप्ला कंपनी यांच्यात नुकताच संपन्न झाला असे वृत्त डिजिटल पुणे न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.

     या कराराद्वारे कामगारांना रुपये १५८००/- एवढी वाढ दरमहा मिळणार आहे. यापैकी ५० टक्के रक्कम ही मूळ वेतन आणि अन्य रक्कम विविध भत्त्यांमध्ये दिली जाईल. कराराचा कालावधी  एप्रिल २०२३ पासून तीन वर्षाचा राहील.

     कंपनीच्या वतीने एचआर हेड अनिरुद्ध कुंटे, प्लांट हेड  पराग देशमुख, एच आर मॅनेजर  विनायक काळे, श्री वेदराज यासह युनियनच्यावतीने  जनरल सेक्रेटरी ऍड.अनिल ढुमणे, अशोक निकम , दामोदर जोशी, महादेव कचरे, बागडे पाटील, संजय लाड, गणेश आंबवणे, रवींद्र वळंजू, अनिल जाधव यांनी करारावर सह्या केल्या.