मुंबई : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई येथील लिपिक वर्ग संघटनेचा ६६ वा वर्धापन धुरु सभागृह,दादर येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुद्रणालयाचे सहायक व्यवस्थापक सचिन हजारे होते.
प्रमुख पाहुणे संघटनेचे सल्लागार ज्येष्ठ कामगार नेते अविनाश दौंड यांनी या प्रसंगी शासकीय कर्मचाऱ्यांसमोरील आव्हाने आणि भावी आंदोलन याबाबत विस्तृत विवेचन केले. दौंड यांनी शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी भरती रद्द करुन सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत अशी आग्रही मागणी केली. कार्यक्रमात कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या ३२ सभासद पाल्यांच्या भेटवस्तू आणि प्रमाणात देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रेसेस फेडरेशनचे विजय चव्हाण, सुनील यासम , शासकीय मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेचे राजेंद्र जाधव, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे प्रमोद मोरे, संचालनालय कर्मचारी संघटनेचे दिगंबर पालांडे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस बाळकृष्ण तुरुंबाडकर , संचलन नंदकुमार सोनावणे यांनी तर आभारप्रदर्शन अध्यक्ष संतोष डोके यांनी केले. याप्रसंगी संघटना सभासद आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.