पुणे : आज दसरा याच शुभ मुहुर्तावरती 'कामगार नामा' ची सुरवात दि. 8 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आली. आज 'कामगार नामा' चा चतुर्थ वर्धापन दिन यानिमित्त एक घेतलेला आढावा
'कामगार नामा' चे संस्थापक संपादक व मुख्य समन्वयक श्री भूषण विजय कडेकर यांचे शिरूर,पुणे हे गाव. कामगार क्षेत्रामध्ये 15 वर्षे कामगार म्हणून विविध कंपनी मध्ये काम केले. यामध्ये टाटा मोटर्स पुणे, व्हील्स इंडिया, Whirlpool रांजणगाव, बॉम्बे डाईंग कंपनी रांजणगाव एमआयडीसी मध्ये 10 वर्ष काम करत असताना कामगार प्रतिनिधी म्हणून 6 वर्ष काम पाहिले.
कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध कामगार कायदे, PF, ESIC, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांचा अभ्यास केला. त्यांना एक खंत होती कि कामगार यांच्यासाठी परिपूर्ण माहिती देणारे वृत्तपत्र नाही म्हणून "दसरा" मुहूर्तावर दि. 8 ऑक्टोबर 2019 रोजी 'कामगार नामा' मासिक प्रथम चालू केले.
त्यानंतर कोरोना कालावधीमध्ये प्रिंटिंग बंद असल्यामुळे मासिक छापण्यास अडचणी आल्या यावरती मात करत दि. 16 नोव्हेंबर 2020 रोजी “दिवाळी पाडवा” मुहूर्तावर www.kamgarnama.com हे ऑनलाईन न्यूज पोर्टल चालू केले. या वेब पोर्टल वरती सर्व प्रकारच्या संघटित / असंघटित कामगार विषयी बातम्या, कामगार कायदे ओळख, विविध कंपनी मध्ये होणारे वेतनवाढ करार, विविध शासकीय योजना, PF, ESIC, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ योजना व विविध माहिती रोज प्रसिद्ध करण्यात येते. या माध्यमातून राज्यातील लाखो कामगार यांच्यापर्यंत माहिती जाते आज रोजी या पोर्टलला 68 लाखाहून अधिक views झाले आहेत.
'कामगार नामा' ची उपलब्धी (Achievement) :
कामगार नामा कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडून कामगार क्षेत्रासाठी ऐतिहासिक कार्यवाही पार पाडण्यास भाग पाडले
1) शासनाकडून दर सहामहिन्याला प्रसिद्ध होणारे विशेष महागाई पत्रक बरोबर किमान वेतन पत्रक प्रसिद्ध करत जावे यासाठी सुमारे 2.5 (अडीच) वर्ष शासनदरबारी, मंत्री महोदय यांच्या कडे पाठपुरवठा केला व याला दि. 1 फेब्रुवारी 2022 रोजी यश आले व कामगार आयुक्त कार्यालय यांनी विशेष महागाई पत्रक बरोबर किमान वेतन पत्रक प्रसिद्ध केले. यामुळे राज्यातील लाखो कामगार यांना आपण ज्या उद्योगात काम करतो तेथे किती किमान वेतन मिळायला पाहिजे याची माहिती मिळाली हि एक ऐतिहासिक घटना कामगार विश्वामध्ये घडली.
2) असंघटित कामगारांना ते ज्या उद्योगामध्ये काम करतात तेथे किमान वेतन मिळावे म्हणून मार्गदर्शन त्याचा लाभ हजारो कामगारांना झाला.
3) याच बरोबर अनुकंपा कृती समितीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील विविध नगरपालिका याची अनुकंपा नियुक्ती पात्र 36 उमेदवार याची यादी तयार करून त्यापैकी 24 उमेदवार यांना नेमणूक मिळाली.
सन्मान :
1) दि. 1 मे 2022 रोजी “कामगार दिन” रोजी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ याच्या द्वारे ‘कै. भाई वैद्य स्मृती पुरस्कार 2022’
2) दि. 1 मे 2022 रोजी “कामगार दिन” रोजी श्रमिक एकता महासंघ याच्या द्वारे ‘विशेष कार्याबद्दल सन्मानचिन्ह’
कार्यरत व पुढील नियोजन :
1) कामगार कल्याण मंडळ योजनांमध्ये 'टायपिंग कोर्स' समाविष्ठ करण्यासाठी मागील एक वर्षांपासून प्रयत्न
2) 'कामगार नामा' च्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कामगार मध्ये विविध कामगार कायदे, विविध कामगार विषयक योजना, PF, ESIC, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ याविषयी संघटित व असंघटित कामगार यांच्यामध्ये जागरूकता (Awareness) आणणे.