पुणे : तळेगाव MIDC येथील FEV इंडिया प्रायव्हेट लिमि. (Fev India Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन व शिवक्रांती कामगार संघटना यांच्यामध्ये मंगळवार दिनांक १७/१०/२०२३ रोजी पहिला त्रैवार्षिक वेतनवाढ करार संपन्न झाला.
कराराची वैशिष्ट्ये खलील प्रमाणे -
कराराचा कालावधी : हा तीन वर्षे दि.०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२४ पर्यंत असा असणार आहे.
वेतनवाढीचे टप्पे पुढीलप्रमाणे
पहिल्या वर्षी - ५०%
दुसऱ्या वर्षी - २०%
तिसऱ्या वर्षी - ३०% या प्रमाणे देण्याचे मान्य करण्यात आले.
वेतनवाढ रक्कम फरक : मागील २.५ वर्षांचा संपुर्ण असा भरघोस फरक एका महिन्याच्या आत दोन टप्प्यामध्ये देण्याचे मान्य केले आहे.
पुढील करारासाठी चे बोलणे ही लगेच चालू करण्याचे आश्वासन देण्यात आलेआहे.
ओव्हरटाईम : हा कामगार कायद्या प्रमाणे (पुर्वी जसा दिला होता तसा पूर्ववत) देण्याचे मान्य केले आहे, व तो एप्रिल २०२३ पासून देण्याचे मान्य केले आहे.
रात्र पाळी भत्ता ( नाईट शिफ्ट अलाऊंस) : रू.१००/- करण्यात आला.
इतर सवलत : बस वापरणाऱ्या कामगाराचे रू. ३००/- पगारातून कटिंग केले जातील व जे कामगार स्वतःची गाडी घेऊन येतील त्यांना रू.२५००/- ट्रान्सपोर्ट अलाऊंस भेटेल तसेच कॅन्टीन व इतर सुविधा प्रचलित पद्धतीने सुरू राहतील.
युनिफॉर्म : कंपनी युनिफॉर्म साठी २ टी-शर्ट व पँट, एक सेफ्टी शूज देण्याचे मान्य करण्यात आले.
बोनस : हा सर्वांना पगाराला पगार देण्याचे मान्य केले आहे.
डेथ इन्शुरन्स : यासाठी रू.२२,००,०००/- (बावीस लाख रुपये) चा सर्व कामगाराचा टर्म इन्शुरन्स काढला जाणार आहे तसेच सोबत जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसाचा पगार जमा करून जेवढी रक्कम जमा होईल तेवढी रक्कम कंपनीकडून मदत म्हणून देण्याचे मान्य केले आहे.
सॅलरी ऍडव्हान्स : महिन्याच्या एकूण पगाराच्या तीन पट देण्याचे मान्य केले आहे.
तसेच ट्रीप,स्नेह संमेलन, आऊट डोअर स्पोर्ट्स, इंनडोअर गेम हे सर्व आहे तसेच चालू ठेवण्यात येईल,
ज्या कामगारांची ५ वर्षाची सर्विस झाली असेल त्या कामगाराला 10000 हजाराचं कुपन व्हाउचर दिले जाणार आहे.तसेच ज्या कामगाराची दहा वर्षे सर्विस पूर्ण झालेली असेल त्या कामगारास अर्धा तोळा Gold Coin दिला जाणार आहे.
करारावरती व्यवस्थापन प्रतिनिधी विजय शर्मा (मॅनेजिंग डारेक्टर), चेतन जोशी (फायनान्स हेड), अनु सेठी (एच.आर.हेड), मानसिंग यादव (एच.आर.मॅनेजर) तसेच शिवक्रांती कामगार संघटना प्रतिनिधी सरचिटणीस विजयराव पाळेकर, वरिष्ठ चिटणीस गुलाबराव मराठे, खजिनदार रवींद्र साठे, संघटक विक्रम गव्हाळे, संघटक अभिजित वाघ, युवा संघटक प्रथमेश पाळेकर, युनिट प्रतिनिधी अध्यक्ष संतोष भानुसे, उपाध्यक्ष महेश अपशिंगे, सरचिटणीस अमोल आटले, सह सरचिटणीस सत्यजित परदेशी, खजिनदार अमोल कराड, संघटक संतोष भुते, देविदास वाघ हे उपस्थित होते.
यावेळी कामगार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले कि, कामगारांच्या बाबतीत गेल्या १३ वर्षात ज्या गोष्टी झाल्या नाहीत अशा अशक्यप्राय गोष्टी सुद्धा विजयराव पाळेकर साहेब यांच्यामुळेच घडल्या आहेत व त्या शक्य झाल्या आहेत. हा करार यशस्वी करण्यामध्ये शिवक्रांती कामगार संघटनेचा फार मोलाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे कंपनी मॅनेजमेंट कडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार
यावेळी कामगार बंधुनी फटाके वाजवून,नाचुन तसेच गुलालाची उधळन करुन व पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.