पिंपरी-चिंचवडसाठी होणार स्वतंत्र कामगार आयुक्तालय

पिंपरी : औद्योगिक, कामगारनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये लाखो कामगार स्थायिक झाले आहेत. आशिया खंडातील सर्वांत मोठी एमआयडीसी म्हणून पिंपरी-चिंचवडचा लौकिक असताना आजही कामगारांच्या प्रश्नासाठी पुण्यात जावे लागते. त्यामुळे चाकण, तळेगाव, वासुली, लोणावळा, हिंजवडी या परिसरातील कामगारांसाठी पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र कामगार आयुक्त कार्यालय स्थापन करण्याचे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले.

    कामगारांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड परीसरात कामगार आयुक्‍त कार्यालय सुरु करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यानुसार राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी लवकरच कामगार आयुक्‍त कार्यालय सुरु करण्याचे आश्‍वासन दिले. कामगारांच्या प्रश्नासाठी पुणे येथे जावे लागत आहे. त्यांचा हा त्रास व वेळेची बचत व्हावी, म्हणून चाकण, तळेगाव, वासुली, लोणावळा, हिंजवडी या परिसरातील कामगारांसाठी पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र कामगार आयुक्त कार्यालय स्थापन करून त्यासाठी आवश्‍यक असलेला स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी वर्ग देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.