लॉरियाल इंडिया एम्प्लॉइज युनियनच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर

पुणे : दिनांक २ आॕगस्ट लॉरियाल इंडिया एम्प्लॉइज युनियनच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त लॉरियाल इंडिया एम्प्लॉइज युनियन आणि लॉरियाल  इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातुन पार पडलेल्या रक्तदान शिबिराला सर्व कामगार बंधू भगिनी, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि कंत्राटी कामगार बंधू यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत रक्तदान केले.

     एकूण २०० जणांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला परंतु हिमोग्लोबिन आणि इतर काही कारणांमुळे जवळ जवळ ३२ जन रक्तदान करू शकले नाहीत.म्हणजे १६८ रक्तदान झाले.पुना ब्लड बॕक यांनी खुप मोठ सहकार्य केले.यावेळी कामगार कल्याण मंडळाचे अविनाश राऊत हे उपस्थित होते. कंपनीच्या वतीने कंपनी प्रमुख अमित गर्ग, एच आर हेड संतोष कदम व अशुतोष चतुर्वेदी, फायनास हेड. रितेश गोयल, प्राॕडक्शन हेड सत्या सिंग, क्वालिटी हेड संजिव कुमार, सेफ्टी हेड मयुर राऊत आणि लॉरियाल इंडिया एम्प्लॉइज युनियनचे अविनाश वाडेकर, गणेश बोचरे, रवि साबळे, निलेश पाटोळे, कमलेश गावडे, अंकुश ताठे, मुकुंद महाळुंगकर, किशोर दाभाडे,गणेश आरुडे, श्रद्धधा सरकार हे उपस्थित होते.