हॉटेल बावा इंटरनॅशनल (Hotel Bawa International) येथे वेतनवाढ करार संपन्न

मुंबई : हॉटेल बावा इंटरनॅशनलमध्ये भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे कर्मचा-यांना १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ५०००/- रुपये पगारवाढीचा करार केलेला आहे. विशेष म्हणजे महासंघातर्फे हॉटेल बावा मध्ये ७ वा पगारवाढीचा करार आहे ही बाब उल्लेखनीय आहे. 

   प्रथम वर्षी २०००/- रुपये, द्वितीय आणि तृतीय वर्षी प्रत्येकी १५००/- रुपये पगारवाढ आहे. मुळ पगारात १०००/- आणि ७५०/- रुपये द्वितीय आणि तृतीय वर्षी वाढ असून प्रवास भत्ता प्रत्येकी तिनही वर्षी ५१००/- रुपये मिळणार असून महिन्याला सर्व दिवस उपस्थित राहिले तर एक दिवसाचा ज्यादा पगार पगारात दिला जाईल. होळी, गुढीपाडवा, गणपती, दिवाळी, ख्रिसमस, यासणांसाठी आगाऊ म्हणून ५०००/- रुपयांची उचल घेता येईल. किरकोळ रजा १० दिवस असून आजारपणासाठी ९ दिवस आणि भरपगारी ३० दिवस वर्षाला रजा आहे. 

    सकाळी ७ ते दुपारी ३ व दुपारी ३ ते रात्री ११ या दोन पाळ्यांमध्ये काम करणा-या कामगारांना नाष्टा, चहा, जेवण तसेच रात्री ११ ते सकाळी ७ मध्ये काम करणा-यांना चहा आणि नाश्ता विनामूल्य मिळणार आहे. २५०००/- रुपये व्याजरहीत मिळणार असून परतफेड दर महिन्याला १०००/- रुपये आहे. बोनस प्रत्येक वर्षी २० टक्के असून प्रतिवर्षी कामगारांना दोन जोडी युनिफॉर्म व १ छत्री तसेच दोन वर्षातून एकदा जोड बूट मिळणार आहे. कोणीही केस वाढवू नये त्यासाठी कू कट आवश्यक आहे. डयुटीवर असताना मोबाईल जवळ न ठेवता तो लॉकरमध्ये ठेवावा. १ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत पगारवाढीची ३४,१००/- रुपयांची थकबाकी मिळाली.

    पगारवाढीच्या करारावर महासंघातर्फे आमदार भाई जगताप सरचिटणीस, देवेंद्र वरुणकर उपाध्यक्ष श्याम खैरे, हितेश पटेल, मिलिंद गावडे, अजय कांबळे, प्रितम प्रभू, महादेव धाडवे, बाळासाहेब त्रिभुवन आणि हॉटेल बावातर्फे संचालक करणवीर सिंग बावा आणि विक्रमवीर सिंग बावा यांनी सहया केल्या.