चाकण : चाकण MIDC फेज 2 मधील फिलिप्स इंडिया लिमिटेड (Philips India Limited) कंपनी व्यवस्थापन आणि शिवक्रांती कामगार संघटना यांच्यामधे पगारवाढीचा त्रैवार्षिक वेतनवाढ करार संपन्न झाला.
मंगळवार दिनांक १८/०७/२०२३ रोजी चाकण औद्योगिक वसाहाती मधील फिलिप्स इंडिया लिमिटेड सावरदरी चाकण, पुणे आणि शिवक्रांती कामगार संघटना यांच्यामध्ये झालेला तिसरा वेतनवाढ करारावरती संघटनेचे सरचिटणीस अँड. विजयराव पाळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
कराराची वैशिष्ट्ये खलील प्रमाणे :
पहिल्या वर्षी : ४०%
दुसऱ्या वर्षी : ३०%
तिसऱ्या वर्षी : ३०%
करार कालावधी : तीन वर्षे दि.०१/०४/२०२२ ते दि.३१/०३/२०२५
मेडिक्लेम पॉलीसी : कुटुंबातील व्यक्तीस ५००००० रु ( पाच लाख रु) पॉलिसी संपूर्ण हप्ता कंपनी भरणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, आणि दोन मुले यांचा समावेश आहे.
दीर्घ सेवा बक्षीस : दीर्घ सेवा बक्षीस म्हणून प्रत्येक कामगारास दर पाच वर्षांनंतर २५०००/- रुपये ( पंचवीस हजार रु.) देण्यात येणार आहे.
तसेच इतर सोई सवलीती मधे वाढ करण्यात आली आहे. बस रुठ,अद्यावत कॅन्टीन सुविधा, EL,,CL,SL तसेच PL मधे वाढ करण्यात आली.
हा करार यशस्वी करण्यामध्ये शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस विजयराव पाळेकर, वरिष्ठ सरचिटणीस गुलाबराव मराठे, खजिनदार रवींद्र साठे, संघटक विक्रम गव्हाणे यांनी सहकार्य केले.
यावेळी सचिन हुजरे (एम डी), पवक दवे (सीनियर मॅनेजर प्रोडक्शन), शरद लोधी (हेड एच आर), स्वप्नील कुलकर्णी (प्लांट एच आर मॅनेजर), सिद्धार्थ पवार (जनरल मॅनेजर) तसेच शिवक्रांती कामगार संघटनेचे फिलिप्स युनिट अध्यक्ष संदीप शिंदे, संघटक प्रशांत खोगरे, खजिनदार तौफिक नदाफ उपस्थित होते.
करार झाल्यानंतर कामगारांनी फटाके वाजवून, तुतारी व ढोलताशा च्या नादावर नाचुन तसेच गुलालाची उधळन करुन आनंद व्यक्त केला.