महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त ३०० घरेलू कामगार महिलांची आरोग्य तपासणी

पुणे : महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना - पुणे जिल्हा व भारती आयुर्वेदिक हॉस्पिटल - धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी संघटनेच्या घरेलू कामगार महिलांची श्री समर्थ मंडळ हॉल पुणे येथे  आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून आरोग्य तपासणी करण्यात आली. ३०० पेक्षा जास्त घरेलू कामगार महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

    प्रशांत दादा जगताप.माजी महापौर पुणे शहर, सोमनाथ आप्पा शिंदे महाराष्ट्र जनरल कामगार युनियन प्रदेश उपाध्यक्ष व काशिनाथ नखाते अध्यक्ष कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तसेच मीनाताई पंडित प्रदेश उपाध्यक्ष, सुवर्णताई कोंढाळकर प्रदेश कार्यकारणी सदस्य यांच्या हस्ते भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली.

    यावेळी २०२२ ते २०२३ वर्षाच्या कार्यवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच २०२३ ते २०२६ या पुढील तीन वर्षाकरिता संघटनेची जिल्हा कार्यकारणी व पुणे शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली व त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा कार्यकरणी मध्ये उषाताई जाधव - जिल्हाध्यक्ष, संध्याताई आदावडे -जिल्हा उपाध्यक्ष, सुनिताताई बढे - जिल्हा चिटणीस, स्वातीताई डिसोजा - जिल्हा संघटन मंत्री.

शहर कार्यकारणी मध्ये शोभनाताई लालन - पुणे शहराध्यक्ष, शीलाताई आटपालकर - शहर उपाध्यक्ष, मिनाज शेख - शहर चिटणीस. अनिताताई गुरव - शहर संघटन मंत्री यांची निवड करण्यात आली.

   यावेळी किशोर उर्फ बाळाभाऊ धनकवडे माजी नगरसेवक पुणे मनपा व शैलेशजी घटपांडे सेवा सहयोग फाउंडेशन, सोनाली ताई परदेशी अध्यक्ष कर्तव्य फाउंडेशन यांनी आरोग्य तपासणी शिबिरास भेट देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद पंडित प्रदेश सरचिटणीस  यांनी केले, उषाताई जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.