चाकण : येथील औद्योगिक वसाहाती मधील गृपोअँटोलिन प्रायव्हेट लिमिटेड (Grupo Antolin Pvt Limited) कंपनी व्यवस्थापन आणि शिवक्रांती कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या चौथा वेतनवाढ करारावरती दि.१८/०७/२०२३रोजी संघटनेचे प्रमुख सरचिटणीस अँड. विजयराव पाळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
पहिल्या वर्षी : ३०%
दुसऱ्या वर्षी : ४०%
तिसऱ्या वर्षी : ३०%
करार कालावधी : दि. ०१/०१/२०२२ ते ३१/१२/२०२४ या तीन वर्षांचा राहील.
फरक रक्कम : प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १८ महिन्याचा फरक ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये देण्यात येणार आहे.
मेडिक्लेम पॉलीसी : कुटुंबातील व्यक्तीस रु.२२५०००- रुपयांची पॉलिसी राहणार संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, आणि मुले यांचा समावेश करण्यात येणार आहे.
ग्रुप लाइफ टर्म इन्शुरन्स : सक्रिय सेवेदरम्यान मृत्यू लाभ ३० लाख रुपये
सूटया : A) PL - १८, B) SL - ७, C) CL - ७, D) PH - ९
दिवाळी बोनस : कामगारांना दिवाळी बोनस हा पगाराच्या व्यतिरीक्त रु.२६४००/- या प्रमाणे देण्यात येईल.
मासिक हजेरी बक्षीस : ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून १०००/- ( एक हजार) रुपये देण्यात येईल.
वैद्यकीय कर्ज सुविधा : प्रत्येक कामगारास ३५०००/- रु देण्यात येईल
a) उच्च प्रतीचे टी शर्ट वर्षाला - २
b) पूर्ण ड्रेस - १,
c) शूज - वर्षामध्ये एक वेळा चांगल्या दर्जाचे मिळतेल
d) दोन वर्षांमध्ये एक जर्किन मिळेल
रात्र पाळी भत्ता : तिसरे पाळीसाठी रु.६०/- रुपये पाळी भत्ता देण्याचे मान्य.
परिवार यामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाल्यास तीन दिवसाची पगारी रजा मिळेल
हा करार यशस्वी करण्यामध्ये शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस विजयराव पाळेकर, वरिष्ठ सरचिटणीस गुलाबराव मराठे, खजिनदार रवींद्र साठे, संघटक विक्रम गव्हाणे यांनी सहकार्य केले.
करावेळी कंपनी व्यवस्थापनाच्यावतीने व्यंकटेश पुगल जनरल मॅनेजर,हिमांशू सिसोरीया सीनियर मॅनेजर प्रोडक्शन, जॉईस सॅम्युल सर जी एम इंडिया हेड एच आर, दिपक खोत प्लांट एच आर मॅनेजर, नितीन थोरबोले असिस्टंट मॅनेजर एच आर तसेच शिवक्रांती कामगार संघटना युनिट अँटोलिनचे पदाधिकारी प्रताप राठोड युनिट अध्यक्ष, गणेश करमारे कार्याध्यक्ष, नितीन चव्हाण सरचिटणीस, दत्ता बवले खजिनदार, प्रशांत गिरी संघटक उपस्थित होते.