कामगार कल्याण मंडळाच्या वतीने समरगीत / स्फुर्तिगीत स्पर्धा संपन्न

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाच्या वतीने समरगीत / स्फुर्तिगीत स्पर्धा सन 2023 - 2024 ची विभागीय कार्यालय पुणे येथे पार पडल्या. अध्यक्ष स्थानी शाहिर दादा पासलकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड. सचिन भुजबळ कामगार अधिकारी राज्य परिवहन महामंडळ पुणे तसेच डॉ. मिलिंद गायकवाड मानवसंधान अधिकारी रत्ना हॉस्पिटल तसेच प्र.कामगार कल्याण अधिकारी संजय सुर्वे उपस्थित होते.

    पुणे विभागाच्या गट कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 9 केंद्रानी सहभाग नोंदवला. यावेळी प्रथम क्रमांक एस टी मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी (कामगार कल्याण केंद्र चाकण), द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र सणसवाडी व तृतीय क्रमांक उद्योगनगर चिंचवड यांनी मिळविला. या मध्ये प्रथम क्रमांक आलेला संघ नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादरीकरण करणार आहे. यावेळी दत्तात्रय चिकोर्डे व्यवस्थापक कार्यशाळा व शुभांगी धुमाळ कल्याण अधिकारी, व चाकण केंद्राचे केंद्र संचालक अविनाश राऊत साहेब यांनी मार्गदर्शन केले. साखरचंद लोखंडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गाने सादरीकरण केले. कल्याण समितीचे सदस्य खंडागळे व अजिंक्य लांडगे यांचे सहकार्य लाभले.