राज्य सरकारचा पहिलाच 'उद्योग रत्न' पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर

मुंबई : महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. आता याच धर्तीवर महाराष्ट्र शासन उद्योग रत्न पुरस्कार सुरू करणार आहे. याचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार जाहीर देखील करण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्र शासनाचा पहिलाच पुरस्कार उद्योजक रतन टाटा यांना देण्यात येणार आहे. 

कसं असणार स्वरुप ? 

    महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1997 मध्ये महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना हा पुरस्कार देण्यास सुरूवात करण्यात आली. या पुरस्कार विजेत्यासाठी 31 जानेवारी 2023 पासून या पुरस्काराच्या मानधनाची रक्कम 10 लाखांवरून 25 लाख रु. करण्यात आली. 2012 पूर्वी 5 लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते. परंतु, सप्टेंबर, 2012 मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले. पुरस्काराची रक्कम 5 लाख रुपयांवरुन 10 लाख रुपये करण्यात आली होती.

पहिलाच 'उद्योग रत्न' पुरस्कार जाहीर झालेले रतन टाटा

    'उद्योग रत्न' जाहीर झालेले रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. वास्तुविशारद बनण्याचे रतन टाटा यांचे बालपणीचे स्वप्न होते. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सोनू टाटा होते. नवल टाटा हे जमशेदजी टाटा यांचा धाकटा मुलगा होते. रतन टाटा हे त्यांचे दत्तक घेतलेला मुलगा होता. जमशेदजी टाटा हे टाटा कंपन्यांचे संस्थापक होते. 

त्यांनी चॅम्पियन स्कूल, मुंबई येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि आर्किटेक्ट होण्याच्या इच्छेने रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. रतन टाटा 1961 मध्ये टाटा समूहात सामील झाले आणि 1991 मध्ये त्यांनी समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. डिसेंबर २०१२ पर्यंत त्यांनी या गटाचे नेतृत्व केले. सध्या ते टाटा समूहाच्या अंतरिम अध्यक्षपदावर आहेत.