सर्व कंत्राटी कामगारांना दरमहा पगार स्लिपा मिळाव्यात

पिंपरी-चिंचवड : महापालिकेत विविध विभागात 10 हजारापेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करीत आहे. संबंधित लेबर काॅन्ट्रॅक्टर त्यांना पगार स्लिपा देत नसलेने त्यांना विविध प्रकारची अल्प मुदतीची अथवा दिर्घ मुदतीची कर्जे काढणे व इतर कामे करणे शक्य होत नाही. 

     तरी दरमहा सर्व कंत्राटी पगार स्लिप मिळाल्याबाबत पुर्तता अहवाल सादर करणेबाबत संबंधित शाखाप्रमुखांना कळविण्यात यावे, अशी मागणी हनुमंत लांडगे (सरचिटणीस, भाजप कामगार आघाडी) यांनी केली आहे.