पुणे : महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना पुणे जिल्हा व सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 जून दिनांक 30 जुलै पर्यंत पुणे जिल्ह्यातील एरंडवना अडले तालुका मावळ लक्ष्मी नगर पर्वती धनकवडी कात्रज या वेगवेगळ्या भागात तसेच श्री समर्थ मंडळ हॉल पुणे येथे घरेलू कामगार महिलांच्या पाल्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या मेळाव्यात प्रसादजी शिरसीकर- सेवासहयोग फाउंडेशन पुणे, भगवानराव देशपांडे-अध्यक्ष समर्थ मंडळ पुणे, किशोर उर्फ बाळाभाऊ धनकवडे-माजी नगरसेवक पुणे मनपा, शरद पंडित प्रदेश सरचिटणीस म.अ.का.संघटना, रसिक दाभाडे चेअरमन रा.सो.,सौ. मीनाताई पंडित प्रदेश उपाध्यक्ष म.अ.का.संघटना यांच्या हस्ते शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले उपस्थित महिलांना व पाल्यांना मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर सुवर्णा कोंढाळकर, उषा जाधव, संध्याआदावडे, सुनीता बढे, स्वाती डिसूजा, मीनल कुदळे, श्वेता चव्हाण, बायडाबाई जगदाळे, स्वप्नाली भेगडे, अनिता गुरव, गीता भिलारे, जनाबाई कुडले, यशोदा साळवे, भाग्यश्री पासलकर, शैला तांदळे, नीता पंखावाला, नीता शिर्के उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने घरेलू कामगार व महिलांची व त्यांच्या पाल्यांची उपस्थिती होती.
