हिताची अ‍ॅस्टेमो फाय कंपनी गुणवंत कामगार पाल्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन संपन्न

चाकण : येथील Hitachi Astemo Fie Employees Union आयोजित सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम दि.23 जुलै 2023 रोजी संपन्न झाला.

      सदर कार्यक्रमाचे उदघाटन युनियन चे अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, Hitachi Astemo Fie pvt. Ltd. कंपनीचे  डायरेक्टर सुधीर गोगटे, प्लॅन्ट हेड शेलार, नवनियुक्त मुख्याधिकारी भूषण माने, अर्चना राजपूत, HR मॅनेजर फडतरे, नगरसेवक वसंतजी बोराटे यांचे हस्ते झाले.

      या कार्यक्रमास 2023 च्या बॅचचे नवनियुक्त मुख्याधिकारी भूषण माने व अर्चनाताई राजपूत यांनी स्पर्धा परीक्षासाठी अभ्यास कसा करावा यासंदर्भात मार्गदर्शन केले. यशाला शॉर्ट कट नाही. त्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतात. अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे, तसेच सोशल मीडियाच्या प्रलोभनातून बाहेर पडून आपण निवडलेल्या क्षेत्रात झोकून देऊन काम करावे. तसेच संघर्ष हा केवळ विध्यार्थीदशेतील चार पाच वर्षांचा आहे. या दिवसात जर चांगला अभ्यास करून चांगली पोस्ट मिळवली तर पुढील आयुष्याची वाटचाल ही सुखकारक होते याविषयी मार्गदर्शन केले.

     यावेळी युनियन सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावर्षी दहावी, बारावी, स्कॅलरशिप, नवोदय, तबला विशारद, सेट, JEE, NEET अशा परीक्षा देणाऱ्या पाल्यांची संख्या जवळपास शंभर इतकी होती. यातील बहुतेक पाल्यांनी नव्वद टक्के पेक्षा जास्त मार्क्स मिळविले आहे. बऱ्याच पाल्यांनी CET परीक्षेत 93 percentile पेक्षा जास्त मिळविले. या वर्षी १) निखिल सुनिल गावडे २) कोमल संजय संभेराव ३) मयूरी गंगागिर गिरी  या तीन पाल्यांची प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या neet परीक्षेतून MBBS साठी निवड झाली आहे. युनियन साठी निश्चित पणे ही अभिमानाची बाब आहे.

     शेवटचे सत्र प्रसिद्ध लेखक, व्याख्याते विजय नवले यांचे करिअर मार्गदर्शन या विषयावर झाले, जवळपास दोन तास नवले सरांनी या विषयावर हसत खेळत अगदी लहान मुलांना देखील खेळवत ठेवत व्याख्यान दिले. करिअरच्या खूप साऱ्या वाटा त्यांनी पालक व पाल्यांसमोर मांडल्या. कार्यक्रमास पालक व पाल्य यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

      यावेळी या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच Hitachi Astemo Fie Employees Union चे अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, सरचिटणीस शंकर गडदे, सह चिटणीस मोहन राऊत, प्रदीप बोरुडे, खजिनदार तुकाराम आवटे, कामगार प्रतिनिधी तुकाराम काळे, हनुमंत ठाकरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोहन राऊत, प्रास्तविक शंकर गडदे यांनी तर आभार तुकाराम आवटे यांनी मानले.