नांदगाव पेठ : पंचतारांकित एमआयडीसीमध्ये (protest workers) असलेल्या श्याम इंडो फेब या कंपनीने चार महिन्यांपासून तब्बल तीनशे कामगारांचे वेतन न दिल्याने भाजप कामगार आघाडीच्या नेतृत्वात बुधवारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. दिवसभर चाललेल्या या आंदोलनानंतर अखेर कंपनी व्यवस्थापनाने माघार घेत सर्व कामगारांना चार महिन्यांचे वेतन अदा केले असे वृत्त तरुण भारत नागपूर या वृत्तसंस्थेने दिले आहे.
मागील चार महिन्यांपासून श्याम इंडो फेब या कापड निर्मिती करणार्या कंपनीने तीनशे कामगारांचे वेतन रोखून ठेवले होते. कामगारांनी वेतनाबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यामुळे (protest workers) कामगारांनी भाजप कामगार आघाडीकडे आपली समस्या सांगितली. कामगार आघाडीचे पदाधिकार्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह श्याम इंडो फेबवर धडक देऊन कामगारांसह काम बंद आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी प्रशासनाने या आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी कामगारांशी संवाद साधून तसेच वरिष्ठांच्या निर्णयानंतर सर्व कामगारांना धनादेशाद्वारे वेतन अदा केले.