चिंचवड,पुणे : "श्रमिकांच्या अनोख्या जगात" हे विवेक पटवर्धन यांनी औद्योगिक संबंधाबाबत लिहिलेले मराठी पुस्तक २९ मे २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता ऑटो क्लस्टर चिंचवड पुणे, ४११०१९, येथे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. टीजीएसबी बँकेचे चेअरमन तसेच थरमॅक्स उद्योग समूहाचे भुतपूर्व एचआर व्हाईसस प्रेसिडेंट शरदजी गांगल यांच्या शुभहस्ते सदर पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रकाशन सोहळ्यासाठी अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सीनियर मॅनेजर (एच. आर.) मोहन पाटील, मा. उपमहापौर केशवराव घोळवे, ऑप्शन पॉझिटिव्ह चे संचालक अरविंद श्रौती, विश्व कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुतराव जगदाळे, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमवंशी, श्रमिक एकता महासंघाचे जनरल सेक्रेटरी रोहित पवार आणि श्रमिक एकता महासंघाचे पदाधिकारी विविध कंपनीतील अधिकारी व पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याची प्रस्तावना श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमवंशी यांनी केली. श्रम व भांडवल यात आंतरिक संघर्ष आहे परंतु मालक व कामगार यामध्ये परस्पर सामंजस्याची भावना रुजली गेली पाहिजे जेणेकरून औद्योगिक संबंध चांगले राहू शकतील. या अनुषंगाने विवेक पटवर्धन यांच्या ४५ वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून संघटित, असंघटित, ट्रेनी ,कंत्राटी, हंगामी कामगारांच्या व्यथा प्रतिबिंबित करणारे, कामगार संघटना व व्यवस्थापनाच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारे हे पुस्तक आहे आणि त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने वाचणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे प्रस्तावना करत श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमवंशी यांनी सोहळ्याची सुरुवात झाली. या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना, सोहळ्याचे प्रमुख पाहुणे शरद गांगल यांनी सदर पुस्तकाबाबत आपल्या भावना व्यक्त करत असताना संपूर्ण पुस्तकाचा विस्तृत आढावा घेतला आणि असे नमूद केले की सदर पुस्तक औद्योगिक वास्तवाबाबतीतले एकमेव पुस्तक आहे व सदर पुस्तक व्यवस्थापन, युनियन, नागरिक व नीती बनविणारे या सर्वाना दिशादर्शक आहे.
तसेच पुस्तकाचे लेखक विवेक पटवर्धन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वाचकांना एक संतुलित दृष्टिकोन मिळावा या हेतूने या पुस्तकाची निर्मिती झाली असे सांगितले. माझे स्वतःचे अनुभव व तसेच कंत्राटी कामगार, कायम कामगार, युनियन, व्यवस्थापन आणि मालक यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन वास्तवाचे दर्शन घडविण्याचे प्रयत्न या पुस्तकाच्याद्वारे केला आहे व हे पुस्तक सर्व युनियन प्रतिनिधी व व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असं त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं.
यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे शोषित, वंचित, पीडित कामगारांच्या व्यथा मांडणारा हे पुस्तक आहे असा आपल्या मनोगताद्वारे सांगितले. श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुतराव जगदाळे यांनी आपल्या मनोगता मध्ये मॅनेजमेंट, युनियन व कामगार आयुक्त कार्यालय यांनी एका प्लॅटफॉर्मवर येऊन औद्योगिक संबंधाबाबत चर्चा करून योग्य ते मार्ग काढण्याच्या हेतून एकत्र आले पाहिजे असे सांगितले.
ऑप्शन पॉझिटिव्ह चे संचालक अरविंद श्रोती आपल्या मनोगतामध्ये बोलताना आपल्या देशामध्ये फक्त काही कंपन्यामध्ये औद्योगिक संबंधाबाबत पॉलिसी आहे ही खेदाची बाब आहे व ती इतर उद्योगांमध्ये कशी निर्माण करता येईल यासाठी एकत्रित रित्या युनियन आणि मॅनेजमेंटनी प्रयत्न केले गेले पाहिजे जेणे करून औद्योगिक शांतता निर्माण करता येईल असे सांगितले. विवेक पटवर्धन यांना औद्योगिक संबंध या क्षेत्राचा सर्वकष अनुभव आहे हे आपण सर्वाना ज्ञात आहेच परंतु ते औद्योगिक संबंधांकडे केवळ प्रबंधकाच्या चष्म्यातून बघत नाहीत तर समाजाच्या हिताकडे बघणाऱ्या नागरिकाच्या नजरेतून पाहतात व त्यामुळे आपल्याला औद्योगिक संबंधांकडे पाहायचा एक संतुलित दुष्टीकोन मिळतो व तीच या पुस्तकाची खासियत आहे असेही ते म्हणाले.
बॉस चासिज चे सीनियर एच. आर. मॅनेजर मोहन पाटील यांनी आपल्या मनोगतमध्ये बोलताना सांगितले की पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये औद्योगिक शांतता निर्माण करण्यासाठी एक फोरम निर्माण करण्याचे आवाहन केले. यानंतर विश्व कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार बोलताना असे सांगतात की व्यवस्थापन आणि कामगार संघटना दोघांना दिशादर्शक ठरणारे हे पुस्तक आहे सुलोख्याने प्रश्न सोडवण्यासाठी या पुस्तकाचा निश्चितच फायदा होईल. अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी बोलताना असे सांगितले की व्यवस्थापन आणि संघटनांनी, असंघटित कामगारांसाठी काम करणे खूप गरजेचे आहे व त्या दृष्टीने सदर पुस्तक सर्वाना मार्गदर्शक ठरेल असेही ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर केशवराव घोळवे यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितले की हे व्यवस्थापन आणि कामगार संघटना व सरकार या सर्वाना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल व तसेच कामगार धोरण ठरविताना या पुस्तकाचा खूप उपयोग होईल असेही ते म्हणाले.
या प्रकाशन समारंभाला एच आर क्षेत्रातील अनेक मान्यवर, युनियन क्षेत्रातील मान्यवर व तसेच कामगार विभागातील सरकारी कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्रमिक एकता महासंघाचे जनरल सेक्रेटरी रोहित पवार यांनी केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन निवेदक प्रदीप तरटे यांनी केले. हा सोहळा श्रमिक एकता महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.