डेल्फिनजेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Delfingen India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : लोणीकंद येथील डेल्फिनजेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Delfingen India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन यांच्या मध्ये वेतनवाढ करार सन २०२३ ते २०२७ या चार  वर्षांसाठी संपन्न झाला.

     यात प्रामुख्याने प्रत्यक्ष १३३०० रूपये व अप्रत्यक्ष १६१५० रूपये इतकी पगारवाढ करण्यात आली, मेडिक्लेम पाॅलीसी ३ लाख रुपये, टर्म इन्शुरन्स पाॅलीसी १५ लाख रुपये, अ‍ॅक्सीडेन्ट पाॅलीसी १० लाख रूपये, आठवड्यातुन दोन दिवस नॉनवेज जेवण व इतर कायदेशीर देय असणारे फायदे कर्मचाऱ्यानां देण्यात आले.

    या वेतनवाढ करारावर कंपनीच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्टर इंडिया मॅन्युफॅक्चरिंग दिपक मोनाचा, एच आर हेड इंडिया संदिप उजागरे, प्लॅन्ट मॅनेजर दिपक तिवारी, डेप्युटी मॅनेजर एच आर अ‍ॅण्ड आय आर संदीप पाटील, एच आर अ‍ॅडमीन शैलेश सनगारे तसेच संघटनेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी कामगार सेल चे सरचिटणीस सोमनाथआप्पा शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष जयदीप बडदे, पुणेशहर उपाध्यक्ष विपीन खंडागळे,कार्यालयीन सचिव रामेश्वर निकम, पुणे शहर सचिव बाबा घोलप, युनिट अध्यक्ष उमेश गलांडे, उपाध्यक्ष महेश वरद, वर्षाताई गलांडे, सचिव सचिन गलांडे, खजिनदार पांडुरंग वाडलाकोडां यांनी करारावर स्वाक्षरी केल्या या करारामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.