पुणे : उर्से,तळेगाव दाभाडे येथील जयाहिंद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (Jaya Hind Industries Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांच्यामध्ये दि.18 मे 2023 रोजी 4 था वेतनवाढ करार उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ अध्यक्ष सचिनभाऊ अहिर आणि कंपनीचे एम डी प्रसन्नजी फिरोदिया यांच्या मध्ये करार संपन्न झाला.
करारातील वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे -
कराराचा कालावधी : करार हा 01 डिसेंबर 2022 ते पुढील तीन वर्ष राहील.
वेतनवाढ : सीटीसी 11500 /-- वाढ करण्यात आलेली आहे. तसेच 01 जुलै 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आठ हजार पन्नास रुपये याप्रमाणे प्रो डाटाबेस दिला जाईल
8.33% ते 9% = 6500/-,
10 % = 5000 /-
11% = 4000/-
12% = 3000 /-
13 % = 2000 /-
14 % = 1500 /-
15 % आणि no Ex. Grat. आणि ज्या वर्षी set on असेल त्यावर्षी 20 % बोनस दिला जाईल.
इन्शुरन्स पॉलिसी : पॉलिसी 1 लाखावरून 2 लाख रुपये करण्यात आली आहे.
नवीन बस रूट : भोसरी आणि काळेवाडी या दोन्ही बस जसा आहे तसाच चालू राहतील, काळेवाडी बस या रूट मध्ये वडगाव इकडे स्टॉप बंद करण्यात आलेले असून, एक नवीन बस रूट चालू केला आहे तो मोशी डी मार्ट - देहुगाव - भंडारा डोंगर मार्गे तळेगाव तसेच माउंट सेंट स्कूल जवळून वडगाव मार्गे उर्से असा असेल.
डाय कास्टिंग -
0 ते 6 = Nil
6.1 ते 10 = 0.95
10 ते पुढे = 0.85
मशीन शॉप -
0 ते 1 = Nil
1.1 ते 2 = 0.95
2.1 ते 3 = 0.85
3.1 ते पुढे = 0.75 याप्रमाणे असेल.
मरणोत्तर सहायता निधी : एखादा कायमस्वरूपी कामगार मृत पावल्यास त्याच्या कुटुंबास मदत निधी म्हणून युनियनच्या प्रत्येक कामगाराचे 1800 रुपये व व्यवस्थापन दोघांनी मिळून 10 लाख रुपये देण्यात येईल.
प्रोडक्शन अलाउन्स आणि इन्सेंटिव्ह : प्रोडक्शन अलाउन्स आणि इन्सेंटिव्ह दोन्ही मिळून 16 टक्के मान्य करण्यात आलेला आहे.
स्पोर्ट ऍक्टिव्हिटी : कंपनी व्यवस्थापनाने पन्नास हजार रुपया मध्ये वाढ करून 75 हजार रुपये करण्यात आली.
करार करण्यासाठी कंपनी व्यवस्थापन तर्फे प्रसन्नजी फिरोदिया (एम डी), प्रशांत इमानदार (एक्सिकेटिव्ह डायरेक्टर), राहुल बागले, मुकेश भंडारी (एच आर हेड), श्रीपाद काटे (वाईस प्रेसिडेन्ट) तसेच कामगार संघटनेच्या वतीने माजी मंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ अध्यक्ष सचिनभाऊ अहिर, प्रदेश सचिव ईश्वर वाघ, उपाध्यक्ष विजय काळोखे व युनिट अध्यक्ष दिनेश घोडेकर, जनरल सेक्रेटरी विक्रम दादा खलाटे, खजिनदार गोपाल पाटील, उपाध्यक्ष दिनेश सिंग, जयदेव चौधरी, सह जनरल सेक्रेटरी चंद्रशेखर पाटील, सहखजिनदार सुधीर क्षीरसागर, सदस्य बाळासाहेब पाटील, सचिन पवार उपस्थित होते.
हा करार यशस्वी होण्यासाठी कामगारांनी दाखवलेला संयम, शांतता, एकजूट, सहकार्य याबद्दल महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेच्या सर्व सभासदांचे आभार मानण्यात आले.
