श्रमिक एकता महासंघाच्या वतीने कामगारदिनी भव्य रॅली व कामगार मेळावा संपन्न

पिंपरी : श्रमिक एकता महासंघाच्या वतीने सोमवार दि. १ मे रोजी पिंपरी-चिंचवड शहरात भव्य अशी कामगार रॅलीचे आणि कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. बजाज ऑटो एम्प्लॉईज को-ऑप. सोसायटी, यमुनानगर निगडी, येथून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. अनेक बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यामधील कामगारांनी उस्फुर्त पणे मोठयासंखेने यामध्ये सहभाग घेतला. 

    कामगार आंदोलनाच्या वेळी गोळीबारात शहीद झालेले कामगार कॉम्रेड दत्ता पाडळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही कामगारांची दुचाकी रॅली,निगडी- पिंपरी - सँडविक कंपनी- चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृह येथे अली. रॅली दरम्यान महासंघाच्या स्वयंसेवक कामगार बांधवांनी अतिशय शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक व्यवस्था करत, वाहतुकीला अडथळा येणार नाही अशा पद्धतीने रॅलीचे संचालन केले. 

   रामकृष्ण मोरे सभागृह येथे भव्य आशा कामगार मेळाव्यात रूपांतर झाले. साधारण 1000 ते 1100 कामगार बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत हा कामगार मेळावा झाला. शिरूर, रांजणगाव,नगर रोड ते जेजुरी, सातारा, शिरवळ पासून खोपोली, तळेगाव ,चाकण, पिंपरी-चिंचवड, पुणे  इत्यादी ठिकाणाहून कामगार बांधव मेळाव्यासाठी उपस्थित होते. 

    प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, श्री छत्रपती शिवाजी महाराज व रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, "चांगल्या कामासाठी इतनी शक्ती दे दाता" अशी विश्वप्रार्थना करत कामगार मेळाव्याची सुरूवात झाली. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमवंशी होते.

     कामगार मेळाव्यासाठी कामगार नेते डी.एल.कराड  साहेब हे नाशिक येथून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मुंबई हायकोर्ट सीनियर एडवोकेट संजय सिंघवी साहेब यांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार देऊन सन्मान केला. उत्कृष्ट व्यवस्थापक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून व्यवस्थापन प्रतिनिधी श्री मोहन पाटील यांना राजश्री शाहू महाराज पुरस्कार देऊन सन्मान केला. श्री पांडुरंग कचरे यांची पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला जनरल सेक्रेटरी रोहित पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महासंघाचा अहवाल सांगितला.

        हायकोर्ट एडवोकेट संजय सिंघवी साहेब यांनी कायदे बदल व इतर गोष्टींचे कारण पुढे करून कामगारांना घाबरवण्याचे प्रकार काही सरकार व व्यवस्थापणा कडून झाले तरी कामगारांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले.आहे या कायद्यांचा वापर करून आपण आपली लढाई लढू व हक्क आणि न्याय मिळवू असा विश्वास कामगारांना दिला.त्यांनी दिलेल्या भक्कम अधारामुळे कामगारांच्या मध्ये चैतन्य भरले व टाळ्यांच्या गजरात कामगारांनी त्यांना दाद दिली. 

    प्रमुख पाहुणे डी.एल.कराड  साहेब यांनी कामगार चळवळ आज आणि उद्या यावर सखोल चर्चा करून त्यावर पूर्ण विश्लेषण सांगितले. महासंघाचे अध्यक्ष आणि आजच्या मेळाव्याचे अध्यक्ष  कामगार नेते किशोर सोमवंशी यांनी अध्यक्षीय भाषणांमध्ये कामगारांनी एकत्र येण्याबरोबरच वेगवेगळ्या लढ्याची माहिती घेतली पाहिजे.स्वतःचे कौशल्य व नेतृत्वगुण वाढवले पाहिजे. विविध प्रशिक्षण घेऊन समर्थ पणे सकारात्मकते आलेल्या प्रसंगाला सामोरे जाऊन काम केले पाहिजे. तसेच प्रसंगी लढायची तयारीही ठेवली पाहीजे. असे सांगून कामगारांना मार्गदर्शन केले.  तसेच मा. उपमहापौर केशव घोळवे, महिला अध्यक्ष सौ विद्या तांबे, युनियन सल्लागार अरविंद श्रौती साहेब यांनीही सर्व कामगार सभासदांना मार्गदर्शन केले .

     विकास कर्पे व राजेंद्र पाटील यांनी अतिशय चांगले सूत्रसंचालन करून सर्व कार्यक्रम सुरळीत पणे उत्साहात संपन्न केला. शेवटी राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली. या साठी महासंघाचे खजिनदार तात्यासो भोसले, दत्तू झेंडे, सायबण्णा गोविंदे, राजेंद्र महाडिक, किरण पाटील तसेच बजाज विश्वकल्याण च्या टीम ने विशेष परिश्रम घेतले.