विसाका इंडिया लिमिटेड (Visaka India Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

दौंड : देलवाडी ता.दौंड,पुणे येथील विसाका इंडिया लिमिटेड (Visaka India Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि जय मल्हार जनरल कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार दि. 13 मार्च 2023 रोजी शांततामय, उत्साही आनंदी वातावरणात संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ठ्ये पुढीलप्रमाणे :

करार कालावधी : कराराचा कालावधी तीन वर्ष असेल. [दि.1 ऑक्टोबर 2021 पासून ते दि.30 सप्टेंबर 2024 पर्यंत] 

प्रत्यक्ष पगार वाढ : एकूण पगारवाढ रु.7100/-
प्रथम वर्ष : 60%
दुसरे वर्ष : 20%
तिसरे वर्ष : 20%
सर्व फरक रक्कम एक रकमी देण्याचे मान्य

रात्रपाळी भत्ता : रु.10/- प्रति रात्रपाळी

Attendance Reward : महिन्यामध्ये संपूर्ण दिवस हजर असल्यावर वर मिळणारा  Attendance Reward रक्कम सर्वांसाठी Rs.200 (दोनशे रुपये ) प्रति महिना निश्चित करण्यात आलेला आहे

अपघात ग्रुप पॉलिसी : अपघात ग्रुप इन्शुरन्स Rs.5,00,000 (पाच लाख रुपये ) करण्यात आलेला आहे. 

सुट्या : 
PL : वर्षाला 15
CL : वर्षाला 5

इतर सुविधा : तीन वर्षासाठी एकदा जर्किंन, प्रत्येक नाईट शिप्ट मध्ये रु.10/- किमतीचा बिस्कीट पुडा, महिन्यात 2 धुण्याचे साबण, प्रत्येक शिफ्टला मोफत चहा, घर खरेदी दुरुस्तीसाठी बिन व्याजी कर्ज, कामगारांना रु.10,000/- ऍडव्हान्स

    कराराच्या वेळी कंपनीच्या वतीने VP प्रसाद सर, सत्यम सर, वर्क्स मॅनेजर महाजन सर, एच आर मॅनेजर आशिष सर, शिरीष सर तसेच संघटनेचे अध्यक्ष संदीप शेलार, उपाध्यक्ष एकनाथ टकले, सचिव हनुमंत टुले, सहसचिव सुरेश शेलार तसेच संभाजी शेलार, शंकर मदने, समीर दोरगे, संतोष कुतवळ, महेन्द्र लव्हटे, अक्षय वाघोले हे उपस्थित होते. 

    करार यशस्वी होण्यासाठी आमदार राहुलदादा कुल यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले अशी माहिती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली.