कामगारांची मुले प्रशासनातील उच्च अधिकारी तसेच ते IAS, IPS व्हावे - अविनाश धर्माधिकारी

चाकण : कामगारांची मुले प्रशासनातील उच्च अधिकारी तसेच ते IAS, IPS व्हावे हे युनियनचे स्वप्न आहे. ते पार करण्याचे पहिले पाऊल हिताची ॲस्टेमो फाय एम्प्लॉईज युनियनच्या वतीने घेण्यात आलेला प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून एक माईल स्टोन म्हणून साध्य होईल. असे प्रतिपादन चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

    हिताची ॲस्टेमो फाय एम्प्लॉईज युनियनच्या वतीने घेण्यात आलेल्या कामगार व त्यांच्या कुटूंबियांसाठी प्रशिक्षण वर्गात धर्माधिकारी बोलत होते.यावेळी मानसोपचार तज्ज्ञ श्रीमती दिपाताई राक्षे,युनियनचे पदाधिकारी, कामगार वर्ग त्यांचे कुटुंब व पाल्य उपस्थित होते.

   सदर प्रशिक्षण वर्ग दोन सत्रात पार पडले. युनियनने त्यांच्या सभासदांचा आर्थिक, भावनिक, शारीरिक, मानसिक विकास केला पाहिजे हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून  सदर प्रशिक्षण वर्ग अतिशय दिमाखात व तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला.

    "यशस्वी जीवनाची पायाभरणी"  या विषयावर श्री धर्माधिकारी यांनी पालक व पाल्य यांना मार्गदर्शन केले. युनियन अशा पद्धतीने काम करत असल्याबद्दल युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.        तसेच सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण ताणतणावाला  सामोरा जात आहे. त्यातून कौटुंबिक नात्यात कुटुता येत आहे. मोबाईलचे दुष्परिणाम कुटुंबावर विशेषतः मुलांवर होत आहे. कौटुंबिक नाते घट्ट व्हावे तसेच कुटुंब  मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडावे या विषय पुण्यातील प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ श्रीमती दिपाताई राक्षे यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने मांडला. 

    कार्यक्रमात स्वागत सूत्रसंचालन सहचिटणीस मोहन राऊत यांनी केले. प्रस्तावीक सरचिटणीस शंकर गडदे यांनी केले. आभार तुकाराम आवटे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजनासाठी सर्व कामगार बांधवांनी मोलाचे सहकार्य केल.