कामगार कल्याण मंडळाचे MSCIT सहाय्यता योजनेकरिता ऑनलाईन अर्ज सुरु

ज्या कामगारांना LIN नंबर मिळाला आहे व ते त्याभागातील कामगार कल्याण मंडळ केंद्राचे सभासद झाले आहेत अशा कामगार व कामगार कुटुंबीयांकरिता  MSCIT सहाय्यता योजनेचे ऑन लाईन अर्ज भरण्या करिता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची वेबसाइट सुरु झालेली आहे.

     https://public.mlwb.in या संकेत स्थळवर जाऊन membership वरती क्लिक करून Application for schemes मध्ये MSCIT सहाय्यता योजनेचा अर्ज भरता येईल. वेबसाईट ओपन झाल्यावर संबंधित कामगारांचा LIN नंबर हा यूजर नेम राहील व रजिस्टर मोबाइल नंबर पासवर्ड राहणार आहे. 

अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२२ आहे.

पात्र कामगार -  

फॅक्ट्ररी अँक्ट अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना  (MIDC  कंपनी  कामगार), बाँम्बे  शॉप  अँक्ट  अंतर्गत  सर्व  दुकाने, द मोटर ट्रान्सपोर्ट अँक्ट अंतर्गत नोंदित आस्थापना  साखर  कारखाने,  सुतगिरणी, लहान-मोठे कारखाने, सर्व बँका,  इन्शुरन्सची कंपनी,  शॉपिंग मॉल्स, वाहतूक कंपन्या, एस.टी. महामंडळ,वीज कंपनी,वीज वितरण कंपनी, बी.एस.एन.एल., एम.टी.एन.एल. दुध संघ,  कापूस  पणन  महासंघ,  गव्हर्नमेंट प्रेस, सर्व दवाखाने, कृषि उद्योग महामंडळ,  सर्व  वृत्तपत्रे,  कुरिअर  सर्विसेस,  प्राथमिक  शिक्षक  बँक   मध्ये  काम  करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांसाठी

      महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमएस.सीआयटी (MSCIT)  हा  संगणक  अभ्यासक्रम  उत्तीर्ण करणाऱ्या   कामगार  व  कामगार   कुटुंबियांना एमकेसीएल  या संस्थेस  भरलेल्या शंभर टक्के शुल्क रकमेच्या ५० टक्के रक्कम  सहायता म्हणून मंजूर करण्याची योजना आहे.

योजनेच्या नियम व अटी -

१) एमएस.सीआयटी  (MSCIT)  हा अभ्यासक्रम  स्वतः कामगार किंवा कामगार कुटुंबीयांनी उत्तीर्ण केल्यास त्यांना योजनेचा लाभ घेता येईल.

२) सदर योजनेचा एका कुटुंबातील एका व्यक्तीस एकदाच लाभ घेता येईल.

३) यायोजनेकरिता अर्ज सादर करणाऱ्या व्यक्तींना कामगार केंद्राचे सर्वसाधारण सभासद होणे आवश्यक आहे

४) ज्या योजनेकरीता एमएस.सीआयटी  (MSCIT)  अभ्यासक्रमासाठी ६० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

५) एमएस.सीआयटी  (MSCIT)  अभ्यासक्रमासाठी  एमकेसीएल  कडे भरणाऱ्या  शुल्काची पावती जोडणे आवश्यक आहे.

६) एमकेसीएलच्या  मान्यताप्राप्त  संस्थेतून एमएस.सीआयटी  (MSCIT)  अभ्यासक्रम  पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

७) अर्जदाराची स्वतःची/पालकाची माहे जून / डिसेंबर या महिन्याची वेतन पावती अर्जासोबत जोडावी सदर पावती मध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण निधी कपात केल्याचा उल्लेख असावा.

८) ज्या अस्थापना  कामगारांच्या  वेतनाच्या  पावती मध्ये  कामगार  कल्याण  निधी  कपात  केल्याचा उल्लेख करत नसतील अशा  कामगारांनी आस्थापने कडून  त्यांच्या  पगारातून कामगार कल्याण निधी  कपात होत  असल्याबाबतचा दाखला अर्जासोबत जोडावा सदर दाखल्यात मंडळाकडील नोंदणी क्रमांक नमूद केलेला असावा.

९) कामगार कुटुंबीय सभासदांनी कामगार  कुटुंबी असल्याच्या पुरविण्याकरिता रेशन कार्डची प्रत सोबत जोडावी

१०) अर्जा सोबत ओळखपत्र म्हणून आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / शाळा किंवा कॉलेजचे ओळखपत्र यापैकी एक जोडणे आवश्यक आहे.

११) अर्जदारांनी अर्ज सादर करताना मागील एक वर्षांमध्ये एमएस.सीआयटी  (MSCIT) कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.

१२) अर्जदारांनी  एमएस.सीआयटी (MSCIT) अभ्यासक्रमासाठी  एमकेसीएल या  संस्थेकडे नियमानुसार प्रत्यक्ष भरलेल्या एकूण शुल्क रकमेच्या ५० टक्के रक्कम सहाय्यता म्हणून मंजूर करण्यात येईल.

 १३) या योजनेमध्ये कामगार कामगार कुटुंबीय अपंग अर्जदार असल्यास १०० टक्के सहाय्यता मंजूर करण्यात येईल.

आवश्यक  कागदपत्रे 

१) एमएस.सीआयटी (MSCIT) परीक्षा किमान ६० टक्के उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित झेरॉक्स प्रत

२) स्वतः किंवा पालक ज्या  आस्थापनेत काम करतात तेथील  माहे जून/ डिसेंबर ची पगार स्लिप ची साक्षांकित झेरॉक्स प्रत (त्यात कामगार कल्याण निधी कपात असावी पगार स्लिप मिळत नसेल तर तेथील व्यवस्थापकाच्या सहीचा निधी कपातीचा दाखला मंडळाच्या नोंदणीकृत क्रमांकासह जोडावा.)

३) एमएस.सीआयटी (MSCIT) परीक्षेकरिता भरलेल्या फीच्या पावतीची साक्षांकित  सत्यप्रत

४) आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान  ओळखपत्र / शाळा  किंवा कॉलेजचे  ओळखपत्र सत्यप्रत

५) रेशन कार्डची साक्षांकित सत्यप्रत

योजना विषयी अधिक माहिती साठी आपल्या भागातील कामगार कल्याण केंद्र येथे संपर्क करावा.