गेस्टॅम्प इंडिया प्रायव्हेट लिमि. (Gestamp India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : येथील गेस्टॅम्प इंडिया प्रायव्हेट लिमि. (Gestamp India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि गेस्टॅम्प एम्प्लॉईस युनियन यांच्यामध्ये तिसरा वेतनवाढ करार शांततामय,उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे : 

करार कालावधी : चार वर्ष असेल ( 1एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026)

एकूण पगार वाढ : अप्रत्यक्ष रु.21100/- व प्रत्यक्ष रु.20,000/-रूपये एवढी झाली आहे.
प्रथम वर्षे :  रु.8000 /- (सर्व रक्कम ही इतर भत्त्यामध्ये)
दुसरे वर्ष :  रु.6000/- (यामधील 2400 /- बेसिक, बाकी रक्कम इतर भत्या मध्ये)
तिसरे वर्ष : रु.3000/- (यामधील 1200 /- बेसिक, बाकी रक्कम इतर भत्या मध्ये)
चौथे वर्ष :  रु.3000/- (यामधील 1200 /- बेसिक, बाकी रक्कम इतर भत्या मध्ये)

फरक रक्कम : दि.1 एप्रिल 2022 पासून ते नोव्हेंबर 2022 पर्यंत रुपये 64,000/- व ओव्हर टाइम एरियस सहित रुपये एक रक्कमी  देण्याचे मान्य करण्यात आले.( जुन्या कामगारांना)                                       

         नवीन 14 एम्पलोयी- सर्व नवीन 14 एम्पलोयी ला युनियन मध्ये घेण्यास मान्यता मिळाली आहे. व त्यांना युनियनला मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले आहे.ही सुविधा 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात येणार आहे ,आणि बस व कॅन्टीन सुविधेची कटिंग १ एप्रिल 2023 पासून कपात  करण्यात येईल. त्यांना 1 एप्रिल 2023 पासून 14000/- रुपयांनी वाढ चालू होईल तसेच त्यांना सन  एप्रिल 2022 ते मार्च 2023 चा 50% फरक देण्यात येईल.

दिवाळी बोनस  : बोनस ऍक्ट 1965 प्रमाणे मिळेल,व ज्या कामगारांचा बेसिक व डी.ए  21000/- रुपये च्या पुढे जाईल त्यांना बोनस हा Exgratia म्हणून देण्यात येईल.

जीपीए पॉलिसी : जुनी रुपये 25 लाख ऍक्सीडेन्ट पॉलिसी होती त्यामध्ये वाढ करून ती रुपये 50 लाख करण्यात आली. त्यामध्ये नॅचरल साठी रुपये 25 लाख असेल.

मेडिक्लेम पॉलीसी : रुपये 2 लाख असेल व (जी पूर्वी बफर पॉलिसी कागदोपत्री रु.1 लाख होती) ( अत्यंत गंभीर आजारामध्ये परिस्थिती पाहून ही पॉलिसी पत्नी व दोन मुलांना लागू करण्यात येईल.)

सेवा जेष्ठता पुरस्कार : सेवा ज्येष्ठता पुरस्कार देण्याचे मान्य करण्यात आले. ते पुढील प्रमाणे 
5 वर्ष सर्व्हिस - रु.5000/-  
10 वर्ष सर्व्हिस - रु.10000/- 
15 वर्ष सर्व्हिस - रु.15000/-
20 वर्ष सर्व्हिस - रु.20000/-
25 वर्ष सर्व्हिस- रु.25000/-  रुपयांचे बक्षिस देण्यात येईल.
वरील प्रमाणे देण्यात येणारा सेवा जेष्ठता पुरस्कार हा 1 एप्रिल 2023 पासून  लागू करण्यात येणार आहे.

बस, सुसज्य कॅन्टीन इतर सेवा व सुविधा ,व गणवेश, मृत्यू सहायता निधी, हे पूर्वी प्रमाणे सर्व लाभ चालू राहतील.

रात्र पाळी भत्ता : पहिला रु.50/- प्रति नाईट होता, तो आत्ता रु.10 /- रुपये वाढ करून रु.60 /- प्रति नाईट करण्यात आला आहे

एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी करण्याचे मान्य करण्यात आले.

दिवाळी ड्राय फ्रुट 600 gm वरून 1 kg करण्यात आले आहे

साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास सध्याची जी प्रॅक्टिस चालू आहे तीच पुढे तशीच चालू राहील.

एक नव्याने नवीन बस रूट चालू करण्याचे मान्य करण्यात आले. (भोसे रूट)

या व्यतिरिक्त जुन्या ज्या सुख सुविधा चालू आहेत त्या आहे तश्याच चालू राहतील.

    सदर करारावेळी कंपनीच्या वतीने कंट्री रीजनल एचआर हेड प्रियांका शक्यवंशी, प्लांट हेड अँड्र्यू खोमचुक, डेप्युटी प्लांट हेड निंबा पाटील, ऑपरेशन हेड अजय फडके, एच आर हेड दिलीप पवार, एच आर मॅनेजर स्वप्नील पाटील तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष वैभव सोनवणे, सरचिटणीस अमित येळवंडे, सिद्धार्थ कांबळे, विष्णू सोनवणे, जालिंदर गायकवाड, राहुल गवारे, राहुल मारने, मनोज माने, तसेच खजिनदार सागर सांडभोर हे उपस्थित होते.

    करार संपन्न करण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले व महासंघाचे सरचिटणीस अविनाश वाडेकर, गणेश जाधव, राजू अण्णा दरेकर, दत्तात्रय येळवंडे आणि कामगार उपायुक्त गजानन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.