दाणा इंडिया कंपनीमध्ये कामगारांना मिळाला बोनस

चाकण : येथील दाणा इंडिया कंपनी व्यवस्थापन आणि शिवगर्जना कामगार संघटना यांच्यामध्ये बोनस आणि सानुग्रह अनुदान (Ex-Gratia) याबाबत साधारणतः दीड महिन्यापासून चर्चा सुरू होती यानुसार बोनस आणि सानुग्रह अनुदान मिळून रक्कम ५५,०००/- रक्कम कामगारांना देण्यात आली अशी माहिती शिवगर्जना कामगार संघटना अध्यक्ष संतोष (आण्णा) बेंद्रे यांनी दिली.

    याकरिता व्यवस्थापनाच्या वतीने प्लॉट मॅनेजर अजय प्रभू, संतोष गाजरे, विजय कंमार तसेच कामगार संघटनेच्या वतीने शिवगर्जना कामगार संघटना अध्यक्ष संतोष (आण्णा) बेंद्रे, युनिट अध्यक्ष अमितकुमार चंद्रकांत लांडगे , बालाजी मधुकर खंकाळ, अक्षय रामदास सोनवणे, दत्तात्रय बबन शिंदे, सुदर्शन नांदखिले उपस्थित होते.

    कामगार संघटनेच्या सर्व सभासदांना बोनस आणि सानुग्रह अनुदान मिळून रक्कम  रु. ५५,०००/-, त्यासोबत रु.७५०/- रुपये किंमतीची बॅग भेट स्वरूपात मिळेल आणि मिठाई देण्यात आली यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले.