औरंगाबाद : महाराष्ट्र राज्याचे झुंजार कामगार नेते यशवंतभाऊ भोसले (संस्थापक अध्यक्ष,राष्ट्रीय श्रमिक आघाडी महाराष्ट्र राज्य) हे सोमवार दि.१७ ऑक्टोबर २०२२ रोजी संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विविध क्षेत्रातील असंख्य कामगारांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासदत्व स्वीकारले.
कामगार नेते यशवंत भोसले यांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे राज्यभर जाळे निर्माण केले आहे तसेच हजारो कामगारांना न्याय मिळवून दिला त्याचमुळे संभाजीनगर येथील महानगरपालिकेतील संगणक विभागातील कर्मचारी,माळी(बाग कामगार) कर्मचारी,अग्निशामक विभागातील कर्मचारी,सफाई कर्मचारी,अशा असंख्य कामगारांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासदत्व स्वीकारले आहे तसेच भोसले साहेब आपण आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. यावेळी अनेक कामगारांच्या समस्या भोसले यांनी जाणुन घेतल्या तसेच संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त यांना भेटून कामगारांच्या बाबतीत सकारात्मक बैठक घेतली.
याशिवाय मनमाड येथील महावितरणचे वीज कर्मचारी, पैठण येथील जायकवाडी धरण प्रकल्पातील कर्मचारी यांनी देखील भोसले यांना भेटून कामगारांच्या अनेक समस्या आणि कंत्राटी कामगारांना होत असलेला त्रास, पिळवणूक होत आहे ते कामगारांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल व तेथील वाय.सी.एम हाॅस्पिटलचे कामगार अशा हजारो कर्मचाऱ्यांना यशवंतभाऊ भोसले यांनी न्याय मिळवून दिला तसाच न्याय आम्हाला मिळणार असा आशावाद कामगारांनी यशवंतभाऊ भोसले यांच्या करिता बोलून दाखवला.

