रायगड: तलोजा MIDC येथील दिपक नायट्राईट लिमि (Deepak Nitrite Limited) कंपनी व्यवस्थापन आणि दिपक नायट्राईट एम्प्लॉईज कामगार संघटना यांच्या मध्ये वेतनवाढ करार दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाला. यावेळी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत उपस्थित होते.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :-
कराराचा कालावधी : चार वर्षाचा (2021 ते 2025)
एकूण पगारवाढ : रु.13,500/- (सी.टी.सी. - रु.17,000/-) हि पगार वाढ पाहील्या वर्षापासून ते चौथ्या वर्षी एकसारखी असेल.
बोनस : पहिल्या वर्षापासून ते चौथ्या वर्षी 20% देण्यात येईल.
सानुग्रह अनुदान : रु.15,200/- प्रति वर्षी
मेडीक्लेम पॉलीसी : रु.3,00,000/- (तीन लाख) देण्याचे मान्य करण्यात आले.
करार यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने युनिट हेड एम गणेशन, राजेश पालकर, भरत सकपाळे, अविनाश परांजपे, हर्षद पाटील तसेच युनियन च्या वतीने अध्यक्ष जितेंद्र घरत, सरचिटणीस राजेंद्र तारेकर, युनिट अध्यक्ष सुरेश म्हात्रे, सचिव शिवराम म्हात्रे, सह सचिव प्रकाश एडगे, खजिनदार गणेश पाटील यांनी काम पाहिले.
