कामगार कल्याण मंडळ योजनांमध्ये 'टायपिंग कोर्स' समाविष्ठ करण्याची कामगार नामा कृती समितीची मागणी

कामगार नामा कृती समिती द्वारे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणारे विविध  योजनामध्ये 'शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा (GCC), शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) AND GCC-SSD-CTC अर्थसहाय्य्य योजना' राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

      महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मार्फत कामगार त्यांचे संबंधित कुटुंबीय यांच्याकरिता विविध योजना, उपक्रम राबविले जातात. याचा फायदा त्या कामगार व कुटुंबियांना निश्चितच होतो.

     सध्याच्या काळामध्ये 'टायपिंग कोर्स' ला खूप महत्व प्रत्येकाला कॉम्पुटर टायपिंग येणे हि काळाची गरज असून शासनाच्या Clerical पदांसाठी देखील टायपिंग अनिवार्य आहे तरी कामगार व कुटुंबीय यांना टायपिंग कोर्स करावे म्हणून कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणारे विविध  योजना मध्ये 'शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा(GCC), शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) AND GCC-SSD-CTC अर्थसहाय्य्य योजना' राबविण्यात यावी. याचा फायदा राज्यातील लाखो कामगार व कुटुंबियांना निश्चितच होईल अशी मागणी कामगार नामा कृती समिती द्वारे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांना करण्यात आली आहे.