कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड (Kalyani Technoforge Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड (Kalyani Technoforge Limited) कंपनी व्यवस्थापन आणि कल्याणी टेक्नोफोर्ज एम्प्लॉइज युनियन संघटना यांच्या मध्ये तिसरा वेतनवाढ करार यशस्वीरीत्या संपन्न झाला. 

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खालील प्रमाणे -

करार कालावधी : सदर करार हा दि. ०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२६ या चार वर्ष कालावधीसाठी लागू असेल.

पगारवाढ : सदर करार हा १६,५००/- रुपये डायरेक्ट वाढ व तसेच, ईनडायरेक्ट वाढ - ६८०/- रुपये असून प्रत्येक्ष पगारवाढ ही १७,१८०/-रूपये प्रत्येक कामगारांना झाली असून ती खालील प्रमाणे
प्रथम वर्षासाठी : ५०% रक्कम - ८२५०/- रुपये.
द्वितीय वर्षासाठी : ३०% रक्कम - ४९५०/- रुपये.
तृतीय वर्षासाठी : १०% रक्कम -  १६५०/- रूपये.
चतुर्थ वर्षासाठी : १०% रक्कम -  १६५०/- रूपये.
बेसिक रक्कम हि पॅकेज च्या २०% असेल.
तसेच ईन्सेंटीव्ह स्किम मध्ये चालू करारामध्ये ४४०/- रुपये वाढ झाली आहे. ती खालीलप्रमाणे....
बेसलाईन - १५००/-रुपये.
स्लॅब - ३००० + ४४० = ३४४०/- रुपये वाढ*.
एकूण ईन्सेंटीव्ह रक्कम - ४९४०/- रुपये अशी राहील.
तसेच पाठिमागील करारामध्ये लागू करण्यात आलेल्या सी.टी.सी मधील लिव्ह- व्हिथ वेजेस ही तरतूद कायम स्वरुपी बंद करण्यात आली.त्यामूळे अप्रत्यक्ष रीत्या सर्व कामगारांचे १६५/- रुपये वाढ झाली. 

फरक रक्कम : कामगारांस ०१ एप्रिलपासून पासुन फरक देण्याचे मान्य केले. फरक (एरियस्)  १०० % देण्याचे मान्य केले. व फरकाची रक्कम ही जूलै च्या पगारात देण्यात येईल.

बोनस : सध्या बोनस कायदा १९६५ नुसार बोनस मिळत होता, परंतू कायद्या नुसार बेसीक + महागाई भत्ता रू.२१००० जर झाला तर बोनस बंद होतो. परंतु युनियन च्या प्रयत्नाने व व्यवस्थापन यांच्या सहकार्याने सर्व कामगारांना बोनस मिळेल.

सेवा जेष्ठता बक्षीस योजना :
१) १५ वर्ष सेवा झाल्यास - १५००/- रुपये व सर्टिफिकेट
२) २० वर्ष सेवा झाल्यास - २०००/- रुपये व सर्टिफिकेट
३) २५ वर्ष सेवा झाल्यास - ५०००/- रुपये व सर्टिफिकेट & स्मृतीचिन्ह.

मेडिक्लेम पॉलिसी :
१) वर्ष - २०२२ ते २०२३ या कालावधीत विमा राशी - १,००,०००/-रुपये राहील.
२) वर्ष - २०२३ ते २०२४ या कालावधीत विमा राशी - १,५०,०००/-रुपये राहील.
३) वर्ष - २०२४ ते २०२६ या कालावधीत मेडिक्लेम चा रेशो पाहून विमा राशी मध्ये वाढ करण्यात येईल.

आरोग्य तपासणी : 
अ) वर्षातून एकदा सर्व कामगारांची आरोग्य तपासणी केली जाईल.
ब) हजारडस मध्ये काम करणाऱ्या कामगारांची आरोग्य तपासणी वर्षा तून दोनदा केली जाईल.
क) सर्व कामगारांना वर्षातून एकदा टी.टी चे इंजेक्शन व ई.सि.जी चेकप केले जाईल.

रात्रपाळी भत्ता :
प्रती रात्रपाळी भत्ता ५०/-रुपये, दि. ०१ ऑगस्ट २०२२ पासून लागू होईल.

उष्णता भत्ता : चाकण व रांजणगाव मध्ये काम करणार्यांना सर्व कामगारांना प्रति दिवस १०/-रुपये उष्णता भत्ता देण्यात येईल व तो ०१ ऑगस्ट २०२२ पासून लागू होईल.

मरणोत्तर सहायत्ता निधी :
१) १ वर्ष ते १० वर्ष सेवा - ३,००,०००/-रुपये.
२) १० ते २० वर्ष सेवा - ३,५०,०००/-रुपये.
३) २० वर्षा पेक्षा जास्त सेवा - ४,००,०००/-रूपये.
४) ॲक्सीडेंट केस मध्ये - जी.पी.ए पॉलिसी देखील लागू होईल. (बेसिक + महागाई भत्ताच्या ३६ पट)
कामगाराच्या कायदेशीर वारसांना चेक द्वारा देण्यात येईल.


पगारी सुट्टी ,रजा व इतर लाभ :
पेड हॉलिडे -
वार्षिक पेड हाँलीडे सात राहतील.
अर्जित रजा -
१) २४० पूर्ण हजर दिवसांसाठी- १२ रजा.
२)२४१ ते २५४ पूर्ण हजर दिवसांसाठी- १५ रजा.
३)२५५ ते २६७ पूर्ण हजर दिवसांसाठी- १७ रजा .
४) २६८ ते २८० पूर्ण हजर दिवसांसाठी- १९ रजा.
५)२८१ ते २९२ पूर्ण हजर दिवसांसाठी-२१ रजा 
६)२९३ व त्या पेक्षा जास्त हजर दिवसांसाठी - २२ रजा.
अ) अर्जित रजा - साठवणूक मर्यादा ६० दिवस राहिल.
ब) अर्जित रजा ह्या चार टप्प्यांत घेता येतील.
क) अर्जीत रजा रोखीकरणासाठी बेसिक + महगाई भता + एच. आर. ए + कन्व्हेयन्स अलाऊन्सची गणना विचारात घेतली जाईल.
किरकोळ रजा :
अ) किरकोळ रजा हया वार्षिक ८ दिवस राहतील.
ब) किरकोळ रजा साठवणूक करता येणार नाही . 
तसेच न वापरलेल्या रजेच्या रोखिकरणासाठी - बेसिक + महगाई भता + एच. आर. ए + कन्व्हेयन्स अलाऊन्सची गणना विचारात घेतली जाईल. 
आजार पणाची रजा :
आजार पणाच्या रजा ह्या वर्षा मध्ये ८ दिवस राहतील.
अ) आजार पणाच्या रजेचे साठवणूक मर्यादा ही १६ दिवस राहिल.
ब) आजार पणाच्या रजेचे रोखीकरण  होणार नाही.
हजेरी बक्षीस योजना : ही सहामाही स्वरूपात राहील म्हणजेच ०१ जानेवारी ते ३० जून . या कालावधीचे हजेरी बक्षीस जूलै महिन्याच्या पगारात व ०१ जूलै ते ३१ डिसेंबर या कालावधीचे हजेरी बक्षीस जानेवारी महिन्याच्या पगारात देण्यात येईल.
हजेरी बक्षीस योजना खालीलप्रमाणे,
१) १३३ ते १३९ पूर्ण हजर दिवस -  ४०००/- रूपये .
२) १४० ते १४५ पूर्ण हजर दिवस - ६०००/- रूपये.
३) १४६ व त्या पेक्षा जास्त हजर दिवस - ७५००/- रुपये.

सॅलरी ॲडव्हान्स :
शिक्षणासाठी कर्ज -
१५,०००/- रुपये व कर्जाची परतफेड हि सात महिने ०% व्याजदराने राहील.
वैद्यकीय कर्ज - ३५००० /- रूपये व कर्जाची परतफेड हि नऊ महिने ०% व्याजदराने राहील

कामगारांना रेस्ट रूम व युनियन साठी कबड :
१) कामगारांना रेस्ट रुमची तरतूद करण्यात आली .
२) यूनिय कमिटिच्या व सोसायटीच्या कामकाजासाठी स्वतंत्र कबड असेल.

सहल भत्ता :
रुपये १२००/- प्रती वर्ष व तो मार्च महिन्याच्या पगारामध्ये देण्यात येईल.

फॅमिली प्रोग्राम : 
सर्व कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वर्षा मध्ये १२ प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातील.

युनिफॉर्म-वाढ : 
१) ज्या कामगारांना एक जोडी ऑफिस गणवेश मिळत होता. आता, त्यांना एक अतिरिक्त ऑफिस शर्ट मिळेल.
२) सेफ्टी विक मध्ये सर्व कामगारांना सरसकट टी-शर्ट देण्यात येईल.
३) थंडीच्या मोसमात सर्व कामगारांना दोन वर्षांतून एकदा स्विट-शर्ट  म्हणजेच जर्किंग देण्यात येईल व त्यासाठी प्रत्येकी दोन कायझन देणे आवश्यक आहे.

बस सुविधा : 
नवीन बस मार्ग पेरणे फाटा ते चाकण बस
पेरणे फाटा - शिक्रापूर - चाकण मार्गे.

पर्किग शेड सुविधा : 
चाकण व रांजणगाव प्लांट साठी टू.व्हीलर साठी कव्हर केलेले पार्किंग प्रदान केले जाईल.

कॅन्टीन : सदर करारामध्ये कोणतीही अतीरीक्त कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही.
तसेच, खालील प्रमाणे मेनूमधे वाढ झाली.
१) आठवड्यात दोन दिवस अंडी.
२) तीन दिवस स्विट. 
३) तीन दिवस केळी.
४) उपवास साठी राजगीरा लाडू व शेंगदाणे चिक्की व्यवस्थापन व कामगार यांची  कॅन्टीन कमिटी सम-समान पदभार घेतील.

कुटंब नियोजन शस्त्रक्रिया :
१) कामगार किंवा त्यांच्या पत्नीने कुटुंब नियोजन ऑपरेशन केल्यास रू. ६०००/- दिले जीतील.
२) जर कामगार स्वतः ची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पाडत असेल तर त्याला दोन दिवस विशेष सुट्टी मिळण्यास पात्र राहतील.

    करारावेळी व्यवस्थापनाच्या वतीने अनंत चिंचोलकर (एच.आर.हेड & डायरेक्टर), राजेंद्र पी. जोशी (व्ही.पी. & प्लॅन्ट हेड), हरीभाऊ जगताप (व्ही.पी. & प्लॅन्ट हेड), संजय कोंढरे (सिनिअर.मॅनेजर एच.आर & आय.आर.), हरीदास कापरे (आय.आर. & लिगल हेड), सचिन गायकवाड (डेप्युटी मॅनेजर - एच.आर & आय.आर.), मानसिंग जाधव (असिस्टंट मॅनेजर एच.आर & आय.आर) आणि युनियन कमिटी मेंबर मनोहर रोहीदास बोरकर (अध्यक्ष), उमेश शिवाजी रसाळ (उपाध्यक्ष), संदिप बाळासाहेब पुंडे (जनरल सेक्रेटरी), रमेश बाळू कड (खजिनदार), योगेश भाऊसाहेब कचरे (संघटक) उपस्थित होते.

    तसेच, गुजरात व राजस्थान येथील आपल्या कामगारांना परत चाकण व रांजणगाव या प्लॅन्ट ला परत आणण्यासाठी एच.आर.विभाग प्रमुख आणि डायरेक्टर अनंत चिंचोलकर व कल्याणी टेक्नोफोर्ज व्यवस्थापनाचे संघटनेने आभार मानले. तसेच हा करार संपन्न होत असताना कंपनी चे एम.डी. रवि नगरकर यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले असे युनियन च्या वतीने सांगण्यात आले.