विल्यम्स कंट्रोल्स इंडिया प्रा.लिमी. (Williams Controls India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : विल्यम्स कंट्रोल्स  इंडिया प्रा.लिमी. (Williams Controls India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि लोककल्याण मजदूर युनियन यांच्यामध्ये पहिला वेतनवाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :

कराराचा कालावधी : तीन वर्ष असेल (1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2024)

एकूण पगार वाढ : रुपये 18,000/- सिटीसी एवढा झाला आहे. इनहॅड रुपये 15,000/-
प्रथम वर्ष : रू 5000/-
दुसरे वर्ष : रू 5000/-
तिसरे वर्ष : रू 5000/-

फरक रक्कम : दि.10 ऑगस्ट 2022 पर्यंत रुपये 1,00,000/- एक रकमी देण्याचे मान्य करण्यात आले.

बोनस : बोनस व एक्स ग्रेशिया बोनस कायद्यानुसार देण्याचे ठरले.

मेडिक्लेम : रुपये तीन लाख प्रत्येकी देण्याचे मान्य करण्यात आले.
जी पी ए मेडिकल पॉलिसी नुसार देण्यात येईल.

कॅन्टीन : चालू असलेल्या सुविधा प्रमाणे.

सेवा पुरस्कार : पाच वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांना स्मृतिचिन्ह देण्याचे ठरले अणि 50 डॉलर देण्यात येईल. दहा वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना 100 डॉलर आणि स्मृति चिन्ह देण्यात येईल.

स्पोर्ट क्लब : वर्षातून एकदा कंपनी अंतर्गत क्रिकेट स्पर्धा भरण्याचे मान्य करण्यात आले.

     करारावेळी कंपनी व्यवस्थापन यांच्यावतीने राजेश ढेकणे (MD), राम घारे (Head HR), देविदास टला (Sr.Managr mfg), प्रसाद दिवाण (QA  Head), तेजगोंडा पाटील (CS), ॲड. श्रीनिवास इनामती व ॲड. जगताप (कंपनी सल्लागार) तसेच लोककल्याण मजदूर युनियन यांच्या वतीने कमिटी मेंबर ॲड. आर. बी. शरमाळे (अध्यक्ष), दादा शरमाळे (सेक्रेटरी), दत्तात्रय जाधव, धिरज कागले, किरण खैरनार, सतिश जाधव, निलेश कापसे, आमित पोवार उपस्थित होते.