ILO आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची बैठक पुणे येथे संपन्न

NFITU च्या वतीने संघटनेचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले उपस्थित

पुणे : NFITU चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दिपकजी जैस्वाल यांनी प्रतिनिधी म्हणून यशवंतभाऊ भोसले यांना निमंत्रित केले होते. Pramoting green & decent jobs creation in the waste value chain sector in india
( specifically bio-medical, plastic & chemical wastes ) या विषयावर बैठक (दि.७ जुलै) झाली, या बैठकीस ILO चे Decent Work Technical Team (DWT) चे विकास तज्ञ केलवीण ए.सर्जेन्ट दक्षिण आशिया व भारत तसेच त्यांचे समवेत राष्ट्रीय प्रकल्प समन्वयक श्रीमती पल्लवी मानसिंघ या उपस्थित मार्गदर्शक होत्या.

    शहरातील "कचरा व्यवस्थापन" मध्ये उत्तम व सुरक्षित नोकरी या विषयांवर चर्चा झाली, त्यास मान्यवर कामगार संघटनेचे प्रतिनिधी व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते, बहुतेक उपस्थितांनी  कचरा व्यवस्थापन मधील कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या, सर्व कामे ठेकेदारांमार्फत होत असून या ठेकेदारीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नाही, सुरक्षेची साधने त्यांना न दिल्याने ते आजारी पडतात, शहराणा स्वच्छ ठेवणारा हा कामगार मात्र वंचित राहिलेला आहे, अशा अनेक समस्यावर या वेळी पूरक चर्चा झाली.

     यावेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले सांगितले कि, पुणे, पिंपरी चिंचवड शहरात ही आंतरराष्ट्रीय संघटनेची बैठक होत असून या बैठकीला जिल्हाधिकारी पुणे व दोन्ही महापालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना देखील निमंत्रण देणे आवश्यक होते, ज्यांचे शहरात ही बैठक होते आहे किमान त्यांना निमंत्रण देणे आवश्यक असून शहरातील स्वच्छतेबाबतचे प्रश्न व कामगारांच्या व्यथा हे तेच सोडवू शकतात अशी मागणी भोसले यांनी केली. सर्व उपस्थितांनी त्यास उत्स्फूर्त दाद दिली. पुढील बैठकीस सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पालिकेचे आयुक्त व कामगार आयुक्त यांना उपस्थित करण्यासाठी नियोजन करू असे श्री.केलवीण यांनी ग्वाही दिली.

     यावेळी शशांक इनामदार व दोन महिने चाललेल्या पॉलिबॉण्ड, राठी कंपनीतील कामगारांच्या आंदोलनाबाबत माहिती दिली, करोना काळात 232 कायम कामगारांना कामावरून कंपनीने काढून टाकले, त्यांची व त्यांच्या परिवाराची उपासमार चालू असून त्यांना ILO ने आपल्या स्थरावर बैठक लावून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली.

     पुढील बैठक लवकरच घेऊन आजच्या बैठकीतील सूचनांचा आढावा सादर करण्यात येईल. तसेच झालेल्या प्रगतीबाबत सर्वांना अवगत करण्यात येईल असे सांगून उपस्थितांचे आभार श्रीमती पल्लवी मानसिंग यांनी मानले.