कामगारांच्या हक्कांसाठी वेळ आल्यास रस्त्यावर उतरणार, भारतीय मजदूर संघाचा इशारा

पुणे - आय आर कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोडमध्ये कामगारांच्या हिताची सुधारणा भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या आहेत, जर सरकारने या सुचवलेल्या बदलाप्रमाणे सुधारणा केल्या नाहीत तर 21 डिसेंबर 2022 रोजी मुंबई येथे राज्यव्यापी लॉग मार्च काढणार असल्याचा इशारा भारतीय मजदूर संघाने सरकारला दिला आहे असे वृत्त एमपीसी न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.

    भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाच्यावतीने वर्धापन 67 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय मजदूर संघाच्या विविध संघटना, औद्योगिक, वीज उद्योगातील कायम / कंत्राटी कामगार, ऐल आय सी, संरक्षण उद्योग, बॅंक, शासकीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक, बिडी कामगार, बांधकाम कामगार, घरेलु कामगार, विविध ऊद्योगातील पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    संसदेच्या दोन्ही सभागृहात नुकतेच 44 कामगार कायद्यांचे 4 कोड बिलमध्ये रूपांतर केले आहे. यामधील वेज कोड व सोशल सिक्युरिटी कोडचे भामसंघाने स्वागत केले असून यामुळे रोजगारात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे तसेच असंघटीत कामगारांची नोंदणी, कल्याणकारी योजना, ई श्रम पोर्टलव्दारे नोंदणी, नुतनीकरण ई लाभ कामगारांना होणार आहेत. परंतु सरकारच्या आय. आर. कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोडमुळे भविष्यात कायम कामगारांच्या रोजगार, सेवा शर्ती, नोकरीमध्ये सुरक्षा, औद्योगिक कलह पध्दतीं, न्याय निवडा पध्दतींमध्ये मोठ्या कामगार व कामगार संघटने समोर मोठ्या प्रमाणात आव्हान उभे राहणार आहे त्यामुळे आय आर कोड व हेल्थ अॅड सेफ्टी कोडमध्ये कामगारांच्या हिताचे सुधारणा भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या आहेत, जर सरकारने या सुचवलेल्या बदलाप्रमाणे सुधारणा केल्या नाहीत तर कामगार रस्त्यावर उतरतील, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.