पायोनियर डिस्टलरिज लि.(Pioneer Distilleries Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

नांदेड : दि. २५ जुलै २०२२ रोजी पायोनियर डिस्टलरिज लि. (Pioneer Distilleries Ltd.) बाळापुर, ता. धर्माबाद जि.नांदेड येथील कंपनीत मराठवाडा राष्ट्रीय पायोनियर डिस्टलरिज कामगार संघ (सलग्नं सीटू) बाळापुर ता. धर्माबाद जि. नांदेड च्या नेत्रत्वाखाली पायोनियर डिस्टलरिज लि. बाळापुर कंपनी व्यवस्थापन व मराठवाडा राष्ट्रीय पायोनियर डिस्टलरिज कामगार संघ सलग्नंसीटू बाळापुर ता.धर्माबाद संघटनेत पगारवाढीचा करार उभय पक्षात सहमती होऊन पगार वाढीचा करार संपन्न झाला.

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खालील प्रमाणे -

कालावधी : सदर करार १ ऑक्टोबर २०२१ पासून चार वर्षासाठी करण्यात आला आहे

पगारवाढ : कामगारांना रु.७,५००/- रु.ची  पगारवाढ, पहिल्या वर्षी ६० टक्के, दुसरे वर्ष २० टक्के, व तिसरे वर्ष १० चौथे वर्ष १० टक्के आहे.
वाढीव पगार ५२% पगार हे बेसिक मध्ये व ४८% पगार इतर अलाउन्स मध्ये देण्यात येणार आहे.

फरक रक्कम : सर्व कामगाराना १० महिने फरकाची  ४५,०००/रु मिळणार. 

व्हीडिए : सध्या चालू असलेल्या इंडेक्स प्रमाणे पुढेही चालू राहिल. 

मेडिकल पॉलिसी : सर्व कामगारांना मेडिकल पॉलिसी २,००,०००/- (दोन लाख) रु.ची लागू करण्यात आली आहे. 

मृत्यू विमा : अपघात व कसल्याही आजाराने मयत झालेल्या कामगारास ५,००,०००/ लाख रु. देणार.

अपघात विमा : कंपनीस कामावर ये जा करताना अपघात झाल्यास पुर्ण खर्च कंपनी करणार व पगार शर्तीअटी नुसार देण्यात येणार आहे.

नविन वर्ष : वर्षात एकदा सर्व कामगार बंधू यांना डिसेंबरच्या पगारात २,०००/ रु. नविन वर्ष साजरे करण्यास देण्यात आले आहे .

सर्व कामगार बंधूना वर्षाला दोन गणवेश व सेप्टी शूज देण्यात येणार आहे. 

अ‍ॅडव्हान्स : प्रत्येक महिन्यात पाच कामगार बंधूना पगारी अ‍ॅडव्हान्स रु.३०,०००/-रु. देण्यात येईल. दहा समान हप्त्यात कपात होणार.

दिपावली बोनस : कायद्यानुसार देणार व ड्रायफुड बॉक्स,एक कुपन  देणार. व २,०००/रु.अ‍ॅडव्हान्स देण्यात येणार आहे 

रजा : EL रजा - २८ व CL - १०, SL रजा - ९ व पेड हॉलिडे - १२ आहेत. 

अंतिमसंस्कार खर्च : कार्यरत मयत कामगाराच्या अंतिमसंस्कारासाठी रु.१०,०००/- देणार

वुलन जॅकेट : चार वर्षांत एकदा उच्च दर्जाचे वुलन जॅकेट देण्यात येणार आहे.

संघटना वर्गणी : कंपनीच्या वतीने संघटना वर्गणी/फंड हे कामगारांच्या पगारात कपात करुन संघटनेच्या खात्यात जमा करण्यात येणार.

संघटना ऑफिस : कंपनी स्वखर्चाने कंपनी आवारात फनर्निचर, कपाट सहीत सुसज्ज असे संघटना कामकाजासाठी ऑफिस देणार आहे.

    करारावर व्यवस्थापनाच्या तर्फे अलोकेश बिस्वास (एम डी), नागराज (एचआर युनिटहेड) आणि संघटने तर्फे औरंगाबाद मजदुर युनियन चे सचिव कॉ. अजय उध्दव भवलकर, औरंगाबाद मजदुर युनियन कमेटी सदस्य, म.रा.पा.डि.का.संघ सलग्नंसीटू बाळापुर,धर्माबाद जनरल सेक्रेटरी कॉ. वाय. बी. पवार, कार्याध्यक्ष रामलू बाळापुरकर, उपाध्यक्ष कॉ.संतोष ठाकरे, उपाध्यक्ष कॉ.शिवप्पा गुंडाळे, सहसेक्रेटरी कॉ. साईनाथ पवार, कोषाध्यक्ष कॉ. नागेश मंतोड, सदस्य कॉ. राहूल कांबळे, कॉ.के जीवन, कॉ.मारोती कोदळे, कॉ.विठ्ठल बुयोड,कॉ.गंगाधर कामगोंडे उपस्थित होते.