एच आर क्षेत्रातील अधिकाऱ्यांना विशेष हक्कप्राप्तीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटचे राष्ट्रीय स्तरावर विशेष प्रयत्न सुरू - विश्वेश कुलकर्णी
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (NIPM) पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टर च्या वतीने २३ जुलै २०२२ रोजी आकुर्डी येथील हॉटेल एक्सोटीका येथे, नवीन वेज कोड मधिल संधी व प्रस्तावित धोके याविषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, या चर्चासत्रात ॲडव्होकेट आदित्य जोशी, टॉपसोर्स वर्ल्डवाईड इंडिया सीओइ ऑपरेशन्स लीडर सचिन दिसा, अल्फा लवालचे सीएचआरओ विनोद बिडवाईक, विलो मदर प्लांटचे माजी सीएचआरओ सुनील कोदे, राष्ट्रवादी कामगार सेलचे कामगार नेते शिवाजीराव खटकाळे व महिंद्रा अँड महिंद्रा चाकण चे माजी आयआर हेड महेश करंदीकर यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी व्यासपीठावर एनआयपीएमचे राष्ट्रीय प्रेसिडेंट विश्वेश कुलकर्णी, मुळशी तालुका इंडस्ट्रियल असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष सतीश करंजकर, एनआयपीएम पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टरचे चेअरमन नवनाथ सूर्यवंशी, उपाध्यक्ष सतीश पवार, माजी अध्यक्ष अमोल कागवडे, सेक्रेटरी अभय खुरसाळे उपस्थित होते.
या चर्चासत्रात श्री करंदीकर यांनी मॉडरेटर ची भूमिका बजावली. या विषयावर मार्गदर्श करताना आदित्य जोशी म्हणाले की, या कोड मध्ये सरकारने घालून दिलेले नियम व अटी आणि त्याची पूर्तता करण्याचे बंधन हे अधिक कडक होणार आहे व त्याची पूर्तता न केल्यास यामध्ये अधिक दंड व शिक्षेचे प्रावधान आहे. व ही बाब प्रत्येक अस्थापनाच्या मॅनेजर व सी ई ओ यांनी लक्ष्यात घेणे आवश्यक आहे.
श्री कोदे यांनी आपल्या पावर पॉइंट प्रेसेंटेशन च्या माध्यमातून नवीन वेज कोड मध्ये समाविष्ट होणाऱ्या पगाराचे पॅकेजमध्ये होणारे बदल व त्याचे ब्रेकअप व पेरोल साठी उपयुक्त असलेले फॉर्मुले याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
श्री बिडवाईक यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये या सत्राचा सारांश घेत वेज कोड मध्ये सद्य स्थिती व होणारे बदल या संदर्भातील फरक स्पष्ट करून याबाबत सविस्तर माहिती सोपी करून सांगितली.
सचिन दिसा यांनी लहान आणि मोठ्या इंडस्ट्रीवर होणारे फायनान्शियल परिणाम व एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यास शेवटच्या कामाच्या दिवसांनंतर फायनल सेटलमेंट करण्यासाठी फक्त दोन दिवसांचा दिलेला अवधी हा खूपच कमी असल्याची माहिती त्यांनी दिली.
कामगार नेते शिवाजीराव खटकाळे हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, जे कामगार नेते आपल्या कामगारांना वास्तविकता व सद्य परिस्थितीची जाणीव करून देतील अशाच कामगार संघटना व त्या कामगार संघटनेचे नेते पर्यायने, त्या संस्था किंवा आस्थापना टिकून राहतील.
विश्वेश कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एच आर क्षेत्रातील अधिकाऱ्यांना विशेष हक्कप्राप्तीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटचे राष्ट्रीय स्तरावर विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. तसेच एनआयपीएम पिंपरी-चिंचवड व चाकण हे चॅप्टर अतिशय सक्रिय असून या चॅप्टर मध्ये तरुण कमिटी मेंबरचा सहभाग ही एक विशेष बाब असल्याचे नमूद करून विशेष कौतुक केले.
टॉपसोर्स वर्ल्डवाईड या आंतरराष्ट्रीय संस्थेने ह्या कार्यक्रमचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. या चर्चासत्राचा ३०० हुन अधिक एच आर क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टॉपसोर्स वर्ल्डवाईड या आंतरराष्ट्रीय संस्थेचे आधिकारी अमित कुमार व त्यांची टीम तसेच एनआयपीएम पीसीसी चे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक अमोल कागवडे, तुषार टोंगळे, एनआयपीएम पीसीसी कमिटीचे उपाध्यक्ष सतीश पवार,सेक्रेटरी अभय खुरसाळे, अतिरिक्त सेक्रेटरी चेतन मुसळे, खजिनदार किशोर शिंदे, सदस्य रमेश बागल, प्रदीप मानेकर, अर्जुन माने व मधुकर सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार टोंगळे यांनी व आभार चेअरमन नवनाथ सूर्यवंशी यांनी मानले.