घरेलु महिला कामगारांच्या मुला-मुलींना केले शालेय उपयोगी साहित्याचे वाटप.!

पुणे : सेवा सहायोग फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने बुधवार दि.१३ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना पुणे जिल्हा यांच्या घरेलु कामगार महिलांच्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुला -मुलींना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप सरफराज पिरजादे, निलेश पाटील, श्रीकांत ढगे तसेच ससंस्थेच्या प्रमुख कार्यकर्त्या वृषाली पाटील, मानसी मुळे,मृनमई आपटे, अदिती जोशी, ओंकार ठोंबरे यांच्या हस्ते श्री समर्थ मंडळ हॉल दुसरा मजला आप्पा बळवंत चौक पुणे येथे करण्यात आले. असेच शालेय उपयोगी साहित्याचे वाटप कार्यक्रम पुणे शहराच्या ऐरंडवना गावठाण, दांडेकर पूल,गोकुळ नगर, धनकवडी,लोहियानगर भागात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.                                           

    महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना प्रदेक्षाध्यक्ष शरद पंडित यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये सेवा सहयोग फाऊंडेशन व त्यांना शालेय उपयोगी साहित्य देण्यासाठी मदत करणाऱ्या  कंपन्याचे व कंपनी प्रतिनिधींचे आभार व्यक्त केले. व पुढील काळात असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

   या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना याच्या मीनाताई पंडित, सुवर्णाताई कोंढाळकर, स्वातीताई डिसुझा, उषाताई जाधव, सुनीताताई बढे, शिलाताई तांदळे ,संध्या आदावडे, वर्षा ताडे, मिणाज शेख, सुजाता गुंजाळ, गीता भिलारे, मीनाक्षी बागुल, यशोदा साळवे, उषा मोहिते, स्मिता ननावरे, कांताबाई ढावरे, मंदाकिनी पवळे, सुहासिनी ओव्हाळ, जनाबाई कुडले, नीता शिर्के भाग्यश्री पासलकर आणि सर्व कार्यकर्ते, सभासद त्यांची मुलं-मुली  मोठ्या संख्येने उपस्थित होते.