EPFO मध्ये नवीन बँक अकाउंट अपडेट करा

नवी दिल्ली : सेवानिवृत्तीसाठी पीएफची रक्कम (PF Amount) खूप महत्त्वाची मानली जाते, ही रक्कम निवृत्तीच्या वेळी खूप मदत करते. म्हणून हे पैसे काढू नयेत असा सल्ला तज्ज्ञ देतात. परंतु सर्व तपशील योग्यरित्या भरले असतील तरच तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता. (EPFO)

जर तुम्ही नोकरी बदलली असेल आणि बँक खाते अपडेट केले नसेल तर खूप त्रास होऊ शकतो. 

UAN द्वारे अपडेट करा बँक डिटेल्स जुना किंवा चुकीचा खाते क्रमांक EPFO मध्ये नोंदला गेला असेल तर नवीन बँक खाते UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाऊंट नंबरद्वारे सहज अपडेट करू शकता.

अशी आहे प्रक्रिया :

  • सर्वप्रथम EPFO च्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करा.

  • आता टॉप मेनूवरील 'Manage' टॅबवर क्लिक करा.

  • ड्रॉप डाउन मेनूमधून KYC पर्यायावर जा आणि डॉक्युमेंट टाइपमध्ये Bank निवडा.

  • आता नवीन बँक खात्याचा खाते क्रमांक आणि IFSC कोड भरल्यानंतर save वर क्लिक करा.

  • आता रिक्वेस्ट KYC Pending for Approval म्हणून दिसेल.

  • आवश्यक कागदपत्रे कंपनीकडे जमा करा.

  • कंपनीकडून मंजूरी मिळाल्यानंतर, केवायसी पेंडिंग फॉर अ‍ॅप्रव्हल बदलून डिजिटली अ‍ॅप्रुव्ह केवायसी दिसेल.