वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. वर्षानुवर्षे सातत्याने व नियमितपणे कायम कामगारांच्या बरोबर ऊन, वारा, पाऊस, कोव्हीड महामारी मध्ये वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे कंत्राटी कामगारांचे रोजगार सुरक्षा, पगार, समान काम समान वेतन, कामा वरती न घेणारे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्तावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार यांनी दि 16 जुलै 2022 रोजी भारतीय मजदूर संघ प्रदेश कार्यालयात झालेल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या नागपूर शहरातील झालेल्या कामगारांच्या मेळावा मध्ये अध्यक्षीय भाषणात दिलेला आहे.
वीज उद्योग हा धोकादायक उद्योग समजला जातो, या ठिकाणी कंत्राटी कामगार अनेक वर्षे कार्यरत असुनही अल्प वेतनच मिळत आहे. नाममात्र कंत्राटदारांकडुन कामगारांची विविध मार्गांनी पिळवणूकच केली जात आहे, आवश्यक ते शैक्षणिक प्रमाणपत्र, 12/15 वर्षाचा अनुभव असतानाही कंत्राटदारारा कडून काही कामगारांना पगार न देण्याबाबतीत सांगितले जाते, या मध्ये कंत्राटदारचा उद्देश काही वेगळा असू शकतो. पगार न मिळाल्यास संघटना आंदोलन सुरू करेल असे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले आहे. या वेळी कंत्राटी कामगारांना रोजगारात सुरक्षा, समान काम - समान वेतन करिता करत असलेले प्रयत्न, आंदोलने या बाबतीतची सविस्तर माहिती दिली.
विदर्भ विभागातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न, लक्षवेधी प्रश्नां बाबतीत, कंत्राटी कामगार कायद्यातील तरतूदीचां भंग करणारे करणारे संस्था वर कारवाई करावी, नागपूर मधील कंत्राटी कामगारांचे प्रश्नां बाबतीत अप्पर कामगार आयुक्त नागपूर श्री पाटणकर यांना लेखी पत्र देवुन या बाबतीत वरिष्ठ पातळीवर त्रिपक्षीय बैठक आयोजित करून कामगारांना न्याय देण्यासाठीची मागणी केली आहे. यावेळी पाटणकर यांनी लवकरच मिटींग आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
या मेळाव्यात भारतीय मजदूर संघ जिल्हा प्रमुख ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी महाराष्ट्र वीज कामगार संघांचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राकेश मथुरे, उपाध्यक्ष योगेश सायवांकर, सचिव अभिजित माहुलकर, संघटन मंत्री सुकेश गुरवे, कोषाध्यक्ष समीर हांडे, सागर साबडे सह संघटनमंत्री विकी जावडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.