देहूरोड : दि.२९ जुलै २०२२ रोजी "ठेकेदार कामगार संघ" च्या नोटीस बोर्डाचे उद्धाटन संपन्न झाले. याप्रसंगी देहूरोड छावनी बोर्डचे प्रशासन कैलास पानसरे, भा. म संघाचे राष्ट्रीय प्रभारी अण्णा धुमाळ, भा. म. संघ "बिडी" उमेश विस्वाद, ठेकेदार का. संघाचे ज. सेक्रेटरी सचिन मेंगाळे, भा. म. संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, भा. म. संघ ,राष्ट्रीय. मिडिया प्रभारी निलेश खेडेकर, भा.म. संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते
अशोक थोरात यांनी सुत्रसंचालन केले मान्यवरचे स्वागत सर्व ठेकेदार कामगाराच्या वतीने करण्यात आले सर्व मान्यवरांच्या हस्ते नारळ आणि रिबीन कापून नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. सचिन मेंगाळे यांनी प्रस्तावना सादर केली, अर्जुन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले
भा. म संघाचे राष्ट्रीय प्रभारी आण्णा धुमाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले असंघटित कामगार साठी भारतीय मजदूर संघाच्या विविध मागण्याची माहिती दिली तसेच देहूरोड मध्ये सध्या चालू असलेल्या ठेकेदार कडून जी पिळवणूक करत आहेत त्यांना इशारा दिला जर हे प्रकार थांबले नाहीत तर केंद्रीय पातळीवर हा विषय घेऊन वेळ पडली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करु. राजकीय पक्ष जर ट्रेड युनियन च्या नावाने सुरू केलेले दुकान लवकर बंद करावे कामगारांच्या हक्क मिळवण्यासाठी शाश्वत प्रयत्न करावे. त्यावेळी आम्ही त्यांना मदत करू पण जर राजकीय पक्ष म्हणून आपण कामगारांना त्रास देण्याचा प्रयत्न जर केला भारतीय मजदूर संघ सहन करणार नाही असा इशाराही दिला.
ठेकेदार कामगार संघाचे गणेश भेगडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले बाबूअण्णा यांनी सर्वाना मिठाई वाटून शुभेच्छा दिल्या देहूरोड मधील इतर सर्व संघटनेच्या पदाधिकारी आणि जवळपास २०० ठेकेदार कामगार उपस्थित होते.